// फळांचा...... चापून घेतलेला समाचार ....!!! // -- 2
.......................................................................
// कर्मण्ये - वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ....!!-- असे म्हणतात .//
.......................................................................................................
.......................................................................
// कर्मण्ये - वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ....!!-- असे म्हणतात .//
.......................................................................................................
आंबा---२
..........................
नाच रे मोरा ----''आंब्याच्या '' बनात नाच अश्या बाल गीता पासूनच आपली नि- आंब्याची ओळख होते .बालमित्रच तो .त्याला विसरणे शक्यच नाही .परंतु मोठे झाल्यावर तो ही आपल्याला विविध कारणांनी पारखा होतो व वर्षातून एकदाच कधी काळी मात्र आवर्जून भेटतोच भेटतो,तसेच--- आंबाही मुलांना न चुकता त्यांना सुटी पडण्याच्या उन्हाळी मोसमातच भेटण्यास येतो व पाऊस येई पर्यंत मनसोक्त खेळत रहातो .त्यामुळे मुलाचं तो जिवलग मित्रच असतो .
मोर हा तर आपला राष्ट्रीय पक्षी -- नयन मनोहारी पिसारा डोक्यावर तुरा,लांबलचक पिसारा मोठा राजशाही थाटच जणू .
म्हणजे राजाच ---तोही फळांच्या -- राजाच्याच आमराईत आनंदाने नाचतो .काय योगोयोग पहा .पावसा पूर्वी ढग जमा होतात त्यावरून पावसाचा अंदाज शास्त्रज्ञ बांधतात .तसेच आंब्यालाही ''तूऱ्या प्रमाणेच दिसणारा मोहोर येतो .शेतकरी -बागायतदार खुश होऊन आपल्या आंब्याचा पिकाचा अंदाज घेतात .थंडी संपत येते तसा आंब्याच्या पिकाला बहार येतो .
आंब्याचे झाड दारी असणे म्हणजे ते एक स्वप्नवत असते .
असावे घर ते आपुले छान --!!
पुढे असावा बाग बगीचा
वेळ मंडपी जाई जुईचा
'' आम्रतरूवर '' --मधु मासाचा
फुलावा मोहर पानोपान ---------असावे ..........
पुढे असावा बाग बगीचा
वेळ मंडपी जाई जुईचा
'' आम्रतरूवर '' --मधु मासाचा
फुलावा मोहर पानोपान ---------असावे ..........
(पी.सावळाराम -दशरथ पुजारी --सुमन कल्याणपूर )
वास्तू शांती - पूजा -अथवा कोणतेही शुभ कार्य म्हटले की आंब्याची डहाळी - पाने हमखास हवीतच .मांगल्याचे प्रतीकच .
आंब्याचा आकारच साधारण माणसाच्या '' हृदया'' प्रमाणे असतो .त्यामुळेच तो प्रत्येकाच्या मनात घर करून रहातो व '' हृद्य '' असा बनतो .
त्याचे रंग रूप उगवत्या --सूर्याला साजेसे असे ''मोहक '' असते .आगमनालाच मात्र तो फार-- भाव --खाऊन जातो .फक्त उच्चभ्रू लोकच त्यांचे दर्शन घेण्यास धजावतात .इतर -मात्र वर्तमान पत्रातील फोटो पाहूनच -दुरून डोंगर साजरेचा अनुभव घेतात .हळू हळू तो चोर पावलाने दबकत बाजारात येतो .
ऐन तारुण्याच्या --भरात आणि भाराने लहान थोर -तीच्या मोहक हिरव्या कंच तोंडला पाणी सुटणाऱ्या अवस्थेने मोहात पडतात . ''कैरी '' नावाने तो - नावारूपास येतो .कैरीच्या पन्ह्याने उन्हाळ्याची चाहूल लागते .चैत्र - मासाचा आरंभ होतो . हळदी कुंकू समारंभ - भिशी पार्टी - पुष्करणी अथवा कल्याण -भेळे मध्ये आवर्जून तिची हजेरी असते.कैरीची डाळ --म्हणजे तर खमंग फोडणी देवून चापण्याचा मोह आवरत नाही.अशी एकेक पायरी चढत तो -- अंतिम '' हापूस पायरी '' च्या पदवी पर्यंत पोहोचतो.
सर्व सामान्यही आपापल्या मुलांच्या परीक्षा तर महिला उन्हाळी कामे उरकण्याच्या बेतात असतात .*अक्षय तृतीयेच्या --मुहूर्तावर -आंब्याचा --आम जनतेच्या घरात मात्र पूजा करून प्रवेश होतो .तो पर्यंत त्याच्या गोडीत --आणि कोकणातून भरभरून येणाऱ्या - गाडयात --वाढ होत राहते.थोड्याच अवधीत तो मग --केळी- द्राक्ष यांच्या हातगाडीवरील जागेचा ताबा-- हक्काने घेतो सर्व बाजार पेठ -सुगंधीत अन रंगीत करून सर्व सामन्यांवर मोहिनीच घालतो जणू .घरोघरी -आमरस पुरीचे बेत सुरु होतात .आणि वेगळीच बहार येते.सर्व गाव भर एखाद्या-- वळू -- प्रमाणे धुमाकूळ घालतो.करंड्या -लाकडी पेट्याच्या वाहनात बसून ऐटीत घरोघरी पोहोचतो . शहरातील ओसंडून कचरा पेट्याही त्याची साक्ष देत रहातात .
दुकानांवरील येथे ''रत्नागिरी हापूस मिळतील ''व त्यावरील मोहक भुरळ पाडणारे चित्र पाहून पावले आपोआपच दुकानाकडे वळतात.व हापूसचा वेध नव्हे वास घेऊ लागतात.काही व्यापारीतर खास ''देसाई आंबेवाले --बेहेरे आंबेवाले ''अश्या थाटातच प्रसिद्ध आहेत .त्या आता नव्याने भर पडली ती अल्पावधीतच -- रेडीओ मिरचीच्या खुश्कीच्या मार्गाने - घरोघरी थेट किंचन टेबलवर जाऊन बसलेले ''म्यान्गोवाले डॉट. कॉम हे नव्या दमाचे ..घराघरात आकर्षक बॉक्स मधून घरपोच डिलिव्हरी देत पोहोचलेले नाव.
कार्पोरेट जगतात ही-- तो-- आता आपली वाट --आकर्षक रंगीत बॉकस द्वारे साहेबांचे थेट ए.सी.केबिन मध्ये जावून शोधतो ..व्यापारी मंडळी... ''आम्र मोहोत्च्सव '' भरवून मोठ्या धूम धडाक्यात त्यास लोकांचे दारा पर्यंत तर अगदी सामन्यांच्या खिशा पर्यंत पोहोचवतात.मे -महिन्याचा उकाडा याचे अस्तित्वा मुळेच सुखावह होतो .आईस्क्रीम चा रंग आणि नूरही पालटतो.आम्रखंड - आम्र शिरा -नव्हे तर आम्र मोदक ही जेवणावळीत दिसू लागतात .----सर्वांची मने तर जिंकतोच पण व्यापार्यांच्या ध्यानी - ----मनीची ---चिंताही दूर करतो .हल्ली तर काही तरुण उदयोज्कांनी --- ई- मेल जगताचा फायदा घेत ,ऑन लाईन बुकिंगची व्यवस्था करून आंब्याला घरपोच सन्मान पूर्वक व आस्थेने पोहोच करण्याची व्यवस्था केली आहे .एव्हडेच नव्हे तर --परदेशस्थ -इंग्लंड - अमेरीका येथील सग्या -सोयर्यानाही म्यान्गोवाले डॉट कॉम वाले --४--५ दिवसात आंबे पोहोच करण्यात यशस्वी झाले आहेत . कोकणचा हापूस -पायरी आता थेट वाशिंग्टन - क्याली फोर्नियात आरामात पोहोचतो आहे .
अश्या प्रकारे थोड्या अवधीतच ...जगभराचा कानोसा घेतो .आपले भाऊ बंध -देवगड - कर्नाटक - मद्रास -लंगडा-तोतापुरी -केसर - गावठी -आंबा यानाही थोडी वाट मोकळी करून देत --तो ,धावपळ करून दमल्याने परतीच्या मार्गाला लागतो .तो सर्वांनाच हूर हूर लावून जातो पण त्यापूर्वी वर्ष भराचे सोबती साठी ...उरल्या सुरल्यांना घेऊन निर्वात कॅन व बाटल्यांमध्ये --पल्प --स्वरुपात पिवळ्या - केशरी रंगांत बंदिस्त होतो व--- फ्रीजची --थंडगार हवा खात निवांत बसतो .
अन मागाहून येणाऱ्या आपल्याच बोजड रुपामुळे - कासव गतीने येणाऱ्या हिरव्या रंगाच्या -- भाऊ बंधांना-शिक्षा करतो. कच्च्या स्वरूपातच-- सुऱ्यावर चढवून ---महिलांचे ताब्यात देवून मोकळा होतो . त्याही त्यांचा तिखट - मीठ तेल --- लावून चांगलाच समाचार घेतात . अन चवदार होण्यास मात्र त्याची-- चीनी मातीच्या --अंधार कोठडीत रवानगी करतात.-- प्यारोल-- वर बाहेर येण्याची संधीही वर्ष-भर अधून मधून मोकळी हवा घेण्यास मिळत राहते.
कवी महाशय मात्र -------
आला ग बाई आला ग बाई आला ---
पाडाला---------- पिकलाय आंबा ..
वास बघुनी तुम्ही जाणा हो पाव्हन
नमुना बघून तुम्ही जाणा हो पाव्हन .....
आंब्याचा रंग केशरी
वर लांब शोभे शेंदरी
तोंडाला तुझ्या पाणी सुट
घेवून टाक लगी म्हंजी काळजी मिट.....
घुटमळू तू नग ..बाबा
पाडाला पिकलाय आंबा --------------------
( गीत ,संगीत- तुकाराम शिंदे ----- स्वर- सुलोचना चव्हाण )
अश्या स्वर मधुर गाण्याच्या ...सुरा द्वारे केंव्हाही त्या रसाळ आंब्याची -''आभासी'' भेट घडवून आणतात .हेही नसे थोडके .
अन एव्हाना आपली नजर चुकवून ---- '' मोरही '' --पावसाची-- ढगाळ चाहूल -लागल्याने आपल्या-- प्रेयसीच्या शोधात आंब्याचे वनात धूम ठोकून, पिसारा फुलवून मुक्तपणे आमराईत नाचत नाचतच वनविहार करण्यास केंव्हाच पसार झालेला असतो.......
.........................................................................
डॉ.अरविंद वैद्य
३ ऑगस्ट २०११
* बुधवार *
No comments:
Post a Comment