दूध हे पूर्णान्न तर.... शब्द हे ज्ञानान्न.......!****************************************************** दूध हे पूर्णान्न आहे .हे विज्ञानाचे पुस्तकातील सत्य आपणास लहापणापासून माहित आहे .त्या पासूनच पुढे दही - ताक - लोणी अ....न लोणकढे तूप तयार होत जाते .यात प्रत्येक पायरीवर त्या पदार्थांचे वस्तुमान कमी कमी होत जाते .आणि त्यातील गुणवत्तामात्र वाढीस लागते .दूध बलवर्धक - दही - ताक पाचक , लोणी स्नेहक चविष्ठ तर तूप जड पदार्थांचे पचन सुलभ होण्यास पोषक असे चमचा भराचे औषधच..... म्हणाना.महिनाभर दूधाचे जेतेम १ लिटरभर तूप बनते .यानेच तर त्यातील औषधी गुणधर्म वाढीस लागतात .आयुर्वेदिक शास्त्र शुद्ध तूप वर्षानु - वर्ष टिकून राहते.आणि ह्याच गरमागरम तुपाच्या...... चमचाभर धारेने वरण तूप भातास सात्विक अन्नाचा उच्च दर्जा मिळतो . हृद्य अश्या ....पुरण पोळी - मोदकाचे जठरात सुलभपणे हवन होते .मन तृप्त अन जठराग्नीही शांत होतो आणि वाम कुक्षीलाही वेगळीच.. धुंदी येते.त्याने आपणासही गप्पामध्ये लोणकढी थाप मारण्याची.....सुप्त - शक्ती प्राप्त होते.-------'' राग- मत्सर- द्वेष या पेक्षा प्रेम- आपुलकी-दातृत्व हे गुण अंगी बाणवावेत ''.........!हा झाला एक विचाराला चालना देणारा '' मोजक्या.''.' शब्दातील सुविचार ' .पण गहन गर्भितार्थ असलेला, अन बुद्धीला चालना देणारा .शब्दांचे महा राज्यात नेमकी उलट परिस्थिती असते . हे आपल्या लक्षात येते .सा- रे- ग- म चे सुरेल सप्त स्वर ,इंद्रधनू सोबतीचे नवरंग , अ आ ई या बारा - खडीच्या तंबूतील क ख ग घ.... मुळाक्षरे अगदी..... ह ळ क्ष ज्ञ पर्यंत अगदी सळो की पळो करून सोडतात बालवयात ..त्यात पुढे भर पडते ती ए- ई- आय- ओ- ऊ या इंग्रजी स्वरांची व तब्बल सहवीस .. ए बी सी डी या व्यंजनांची .अन त्यातच ते असते ...''वाघिणीचे दूध ''.हळू हळू ते ही पचनी पडते एखाद्या चीज स्यांडविच-- पिझ्झा प्रमाणे .अ- अननस, ब- बदक ,क- कमल...... कानाशी रुंजी घालू लागतात .त्यामधूनच स्वराक्षरांचे गाणे बनते .बालसुलभ वयात त्यांचे पाठांतर होते . कवींना कविता सुचत जाते . .ते पाहून संगीतकारास त्यातील आत्मा-(मेलडी ) गवसतो. अन कवीश्रेष्ठ मंगेश पाडगावकरांचे शब्दांना महान संगीतकार श्री निवास खळे यांची साथ मिळते अन ............सुरेल सुरातील ..श्रावणात..... घन निळा बरसला...रिमझिम रेशीम धारा ...... हे कर्ण मधुर गाणे..... जन्माला येते .सुजनांच्या मनाचा ठाव घेते चिरकाल पर्यंत .विचारांना पंख फुटतात अन ते सुद्धा ..... बगळ्यांची माळ फुले अजून अंबरात ......प्रमाणे मुक्तपणे भरारी घेत रहातात स्वच्छंद पणे .शालेय जीवनातील वह्या - पुस्तकातील शब्दांची शिदोरी आयुष्यभर'' जीवन सागरात दीप स्तंभा प्रमाणे'' मार्ग दर्शक ठरते.महाविद्यालयीन जीवनातील पुस्तकातील घावूक शब्दांची उलाढाल आर्थिक स्थैर्याला आधारभूत ठरते व जीवन सुकर अन समृद्ध होत जाते .अन फावल्या वेळातील वाचन... खाद्य... सुक्या मेव्या पेक्षा कसुभरही कमी नसते याचा अनुभव पदोपदी येतो.पुं ल - अत्रे - फडके - खांडेकर असे महान लेखक याच शब्दांना धरून आपणास....... पुस्तक रूपाने जगाची नव्याने ओळख करून देतात.जीवनाची काटेरी पावूल वाट, नदी नाल्यांच्या व निर्झरांच्या जलाने मऊशार बनते .रस्त्याचे कडेने वृक्षराजी पाने फुलतात फुले बहरतात व हिरव्यागार गालिच्यांच्या पायघड्या तुडवीत आपण राजमार्गाला कधी येवून पोहोचतो हे समजतही नाही.एखाद्या जिवलग सख्या सोबती प्रमाणेच '' ही पुस्तके'' आपणास साथ देतात. आपले जीवशच्य कंठशच्य सवंगडी बनून रहातात.आयुष्याला सुवर्ण झळाळी देवून जातात.सुहृदांना भेटीदाखल देव घेव करून आपल्यातील स्नेहबंध अधिकच दृढ करतात.सोबत हिंदी - इंग्रजी - संस्कृत भाषे सारखी दिव्या गीर्वाण भाषा सोबतीला असतातच .सवंगडी बनून .आपले जीवन अधिकाधिक समृद्ध करण्यत त्या अग्रभागी असतात.काही महाभाग जर्मन - ज्यापनीज- फ्रेंच या सारख्या परदेशी भाषांशी सूत..... जमवितात .दूधा पासून जसे पुढे... पेढे - बर्फी - गुलाबजाम - पनीर - रसगुल्ले असे पचायला जड व जपूनच खावे लागणारे सुमधूर पदार्थ आपल्या जिव्हेला मोहात पाडतात.तसेच असंख्य शब्द सरितांचा एकत्रित असा महासागर.....'' ग्रंथ ''... स्वरुपात अथांगपणे पानापानाच्या काठावर विहरत रहातो व ज्ञानाच्या कमी अधिक उंचीच्या लाटावर स्वार होतो .या रत्नाकराचे आकंठ भरलेल्या साठ्यातूनच ,..... महर्षि व्यासांचे महाभारत - वाल्मिकींचे रामायण - श्री कृष्णाची गीता ,ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी ,तुकारामाचे अभंग तसेच येशूचे... बायबल - इस्लामच्या शिकवणुकीचे.... कुराण यासारखे '' शाब्दिक अमृत मंथन '' आपसूकच बाहेर पडते.व अक्षर ओळख असलेल्या मानवास वरदानच मिळते. तर अशिक्षित करंटे महाभाग....... महासागर तटावर असूनही तहानलेलेच रहातात कायमचे .आपल्या जीवन प्रवासाच्या आचरणाचा आदर्श राजमार्गच..या ग्रंथातून गवसतो.त्यामुळे .....ग्रंथ हेच आपले गुरु...! अन ग्रंथालये हीच आपली ज्ञान मंदिरे.कोणत्याही मंदिर - मस्जिद - चर्च प्रमाणेच पवित्र तसेच आपली कवाडे सदैव ज्ञान दानासाठी खुली ठेवणारी असतात हेच आपणास जाणवते .म्हणूनच आपले मस्तक नम्रतेने आपसूक झुकतातच.मनःशांतीची प्राप्ती होते......! .न विद्या विनयेन शोभते ....! याची उजळणी होते. .आणि तेथे कर माझे जुळती....! .अश्या मोजक्याच परंतु....'' अर्थगर्भ ''..शब्दांचीच पुन्हा पुन्हा आठवण येते आणि कृतीत उतरते सुद्धा.नाही का ...? आपला काय अनुभव आहे ....?------------------------------------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------ डॉ अरविंद वैद्यपुणेकामिका एकादशी१४ जुलै २०१२
Saturday, July 21, 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment