दूध हे पूर्णान्न तर.... शब्द हे ज्ञानान्न.......!****************************************************** दूध हे पूर्णान्न आहे .हे विज्ञानाचे पुस्तकातील सत्य आपणास लहापणापासून माहित आहे .त्या पासूनच पुढे दही - ताक - लोणी अ....न लोणकढे तूप तयार होत जाते .यात प्रत्येक पायरीवर त्या पदार्थांचे वस्तुमान कमी कमी होत जाते .आणि त्यातील गुणवत्तामात्र वाढीस लागते .दूध बलवर्धक - दही - ताक पाचक , लोणी स्नेहक चविष्ठ तर तूप जड पदार्थांचे पचन सुलभ होण्यास पोषक असे चमचा भराचे औषधच..... म्हणाना.महिनाभर दूधाचे जेतेम १ लिटरभर तूप बनते .यानेच तर त्यातील औषधी गुणधर्म वाढीस लागतात .आयुर्वेदिक शास्त्र शुद्ध तूप वर्षानु - वर्ष टिकून राहते.आणि ह्याच गरमागरम तुपाच्या...... चमचाभर धारेने वरण तूप भातास सात्विक अन्नाचा उच्च दर्जा मिळतो . हृद्य अश्या ....पुरण पोळी - मोदकाचे जठरात सुलभपणे हवन होते .मन तृप्त अन जठराग्नीही शांत होतो आणि वाम कुक्षीलाही वेगळीच.. धुंदी येते.त्याने आपणासही गप्पामध्ये लोणकढी थाप मारण्याची.....सुप्त - शक्ती प्राप्त होते.-------'' राग- मत्सर- द्वेष या पेक्षा प्रेम- आपुलकी-दातृत्व हे गुण अंगी बाणवावेत ''.........!हा झाला एक विचाराला चालना देणारा '' मोजक्या.''.' शब्दातील सुविचार ' .पण गहन गर्भितार्थ असलेला, अन बुद्धीला चालना देणारा .शब्दांचे महा राज्यात नेमकी उलट परिस्थिती असते . हे आपल्या लक्षात येते .सा- रे- ग- म चे सुरेल सप्त स्वर ,इंद्रधनू सोबतीचे नवरंग , अ आ ई या बारा - खडीच्या तंबूतील क ख ग घ.... मुळाक्षरे अगदी..... ह ळ क्ष ज्ञ पर्यंत अगदी सळो की पळो करून सोडतात बालवयात ..त्यात पुढे भर पडते ती ए- ई- आय- ओ- ऊ या इंग्रजी स्वरांची व तब्बल सहवीस .. ए बी सी डी या व्यंजनांची .अन त्यातच ते असते ...''वाघिणीचे दूध ''.हळू हळू ते ही पचनी पडते एखाद्या चीज स्यांडविच-- पिझ्झा प्रमाणे .अ- अननस, ब- बदक ,क- कमल...... कानाशी रुंजी घालू लागतात .त्यामधूनच स्वराक्षरांचे गाणे बनते .बालसुलभ वयात त्यांचे पाठांतर होते . कवींना कविता सुचत जाते . .ते पाहून संगीतकारास त्यातील आत्मा-(मेलडी ) गवसतो. अन कवीश्रेष्ठ मंगेश पाडगावकरांचे शब्दांना महान संगीतकार श्री निवास खळे यांची साथ मिळते अन ............सुरेल सुरातील ..श्रावणात..... घन निळा बरसला...रिमझिम रेशीम धारा ...... हे कर्ण मधुर गाणे..... जन्माला येते .सुजनांच्या मनाचा ठाव घेते चिरकाल पर्यंत .विचारांना पंख फुटतात अन ते सुद्धा ..... बगळ्यांची माळ फुले अजून अंबरात ......प्रमाणे मुक्तपणे भरारी घेत रहातात स्वच्छंद पणे .शालेय जीवनातील वह्या - पुस्तकातील शब्दांची शिदोरी आयुष्यभर'' जीवन सागरात दीप स्तंभा प्रमाणे'' मार्ग दर्शक ठरते.महाविद्यालयीन जीवनातील पुस्तकातील घावूक शब्दांची उलाढाल आर्थिक स्थैर्याला आधारभूत ठरते व जीवन सुकर अन समृद्ध होत जाते .अन फावल्या वेळातील वाचन... खाद्य... सुक्या मेव्या पेक्षा कसुभरही कमी नसते याचा अनुभव पदोपदी येतो.पुं ल - अत्रे - फडके - खांडेकर असे महान लेखक याच शब्दांना धरून आपणास....... पुस्तक रूपाने जगाची नव्याने ओळख करून देतात.जीवनाची काटेरी पावूल वाट, नदी नाल्यांच्या व निर्झरांच्या जलाने मऊशार बनते .रस्त्याचे कडेने वृक्षराजी पाने फुलतात फुले बहरतात व हिरव्यागार गालिच्यांच्या पायघड्या तुडवीत आपण राजमार्गाला कधी येवून पोहोचतो हे समजतही नाही.एखाद्या जिवलग सख्या सोबती प्रमाणेच '' ही पुस्तके'' आपणास साथ देतात. आपले जीवशच्य कंठशच्य सवंगडी बनून रहातात.आयुष्याला सुवर्ण झळाळी देवून जातात.सुहृदांना भेटीदाखल देव घेव करून आपल्यातील स्नेहबंध अधिकच दृढ करतात.सोबत हिंदी - इंग्रजी - संस्कृत भाषे सारखी दिव्या गीर्वाण भाषा सोबतीला असतातच .सवंगडी बनून .आपले जीवन अधिकाधिक समृद्ध करण्यत त्या अग्रभागी असतात.काही महाभाग जर्मन - ज्यापनीज- फ्रेंच या सारख्या परदेशी भाषांशी सूत..... जमवितात .दूधा पासून जसे पुढे... पेढे - बर्फी - गुलाबजाम - पनीर - रसगुल्ले असे पचायला जड व जपूनच खावे लागणारे सुमधूर पदार्थ आपल्या जिव्हेला मोहात पाडतात.तसेच असंख्य शब्द सरितांचा एकत्रित असा महासागर.....'' ग्रंथ ''... स्वरुपात अथांगपणे पानापानाच्या काठावर विहरत रहातो व ज्ञानाच्या कमी अधिक उंचीच्या लाटावर स्वार होतो .या रत्नाकराचे आकंठ भरलेल्या साठ्यातूनच ,..... महर्षि व्यासांचे महाभारत - वाल्मिकींचे रामायण - श्री कृष्णाची गीता ,ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी ,तुकारामाचे अभंग तसेच येशूचे... बायबल - इस्लामच्या शिकवणुकीचे.... कुराण यासारखे '' शाब्दिक अमृत मंथन '' आपसूकच बाहेर पडते.व अक्षर ओळख असलेल्या मानवास वरदानच मिळते. तर अशिक्षित करंटे महाभाग....... महासागर तटावर असूनही तहानलेलेच रहातात कायमचे .आपल्या जीवन प्रवासाच्या आचरणाचा आदर्श राजमार्गच..या ग्रंथातून गवसतो.त्यामुळे .....ग्रंथ हेच आपले गुरु...! अन ग्रंथालये हीच आपली ज्ञान मंदिरे.कोणत्याही मंदिर - मस्जिद - चर्च प्रमाणेच पवित्र तसेच आपली कवाडे सदैव ज्ञान दानासाठी खुली ठेवणारी असतात हेच आपणास जाणवते .म्हणूनच आपले मस्तक नम्रतेने आपसूक झुकतातच.मनःशांतीची प्राप्ती होते......! .न विद्या विनयेन शोभते ....! याची उजळणी होते. .आणि तेथे कर माझे जुळती....! .अश्या मोजक्याच परंतु....'' अर्थगर्भ ''..शब्दांचीच पुन्हा पुन्हा आठवण येते आणि कृतीत उतरते सुद्धा.नाही का ...? आपला काय अनुभव आहे ....?------------------------------------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------ डॉ अरविंद वैद्यपुणेकामिका एकादशी१४ जुलै २०१२
Saturday, July 21, 2012
दूध हे पूर्णान्न तर.... शब्द हे ज्ञानान्न.......!

Thursday, September 15, 2011
// फळांचा...... चापून घेतलेला समाचार ....!!! // -- ५

.......................................................................
// कर्मण्ये - वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ....!!-- असे म्हणतात .//
.......................................................................................................
![]()
पान-सुपारी ----- ५
.............................................
श्रावणातील निळ्या-- मेघातून श्रावण धारा बरसल्याने' वसुंधरा '--नख शिखांत मोहरून जाते . एखाद्या नव वधू प्रमाणे हिरवागार शालू ल्याल्याने व त्यावर पडलेल्या कोवळ्या उन्हाने तिच्या रुपाला वेगळीच सुवर्ण झळाळी येते .ह्या सर्व नयन सुख देणाऱ्या निसर्गाचे उतराई होऊन आनंद साजरा करण्यास स्नेहीजन एकत्र येतात. ---श्रावण -सोमवारी आमचे कडे ''सत्यनारायण व पान सुपारीचा '' कार्यक्रम आहे अशी निमंत्रणे घरोघरी धाडली जातात .आणि अश्या धार्मिक पवित्र कार्याचे निमित्ताने आपला --सुपारी --या फळाशी सहज संबंध जुळून येतो.पान -सुपारी म्हणजे जणू एकाच नाण्याच्या दोन बाजुच जणू एव्हडा हा शब्द प्रयोग परिचयाचा आहे .त्यामुळेच तर धार्मिक विधीत दोघांना एकत्रितच मानाचे स्थान आहे .सुपारीशिवाय पान हलत नाही .
अश्या कार्यक्रमा निमित्तानेच एकमेकातील '' स्नेह-संबंध '' धृढ होतात. म्हणूनच ''सुपारी -फुटली '' हे शब्द उच्चारताच दोन घराण्यातील '' लग्न - संबंध जुळले '' असाच होतो.(......केव्हडा हा विरोधा भास...! ) पुढे ते मात्र अखंड सुपारी प्रमाणेच ते राहावेत हाच त्यातून खरा--
गर्भित अर्थ अभिप्रेत आहे .कोकणातील नारळ -आंबा -कोकम --फणस -या फळ भावंडातील हे खरे तर '' शेंडेफळ ''च म्हणावे लागेल .मूर्ती लहान पण कीर्ती महान ह्या शब्दाच्या प्रचीतीला अजून काय हवे ...?
बालसुलभ कोवळ्या वयात हिरवी मऊ शार असणारी सुपारी चाकुनेही सहजपणे कापता येते .पण उन्हातानात रापून वयात येताच मात्र ती आपला रंग -रूप बदलते तसा स्वभावही कणखर बनत जातो तो एव्हडा की धारदार चाकुलाही ती आता मुळीच घाबरत नाही.ह्या तिच्या हट्टी स्वभावाला वळविण्यासाठी तिला आकाराने छोट्याच अश्या ''अडकित्त्यात '' पकडावे लागते . शक्ती पेक्षा युक्ती उपयोगाला येते . काट्यानेच काटा काढावा लागतो हे सूत्र उपयोगी पडते.
सुपारी जेवणानंतर मुख शुद्धी करता खातात .पान-सुपारी -चुना -लवंग -बडीशेप - वेलदोडा-गुंजपाला हे सप्त सूर एकत्र आले तर अशी काही----- सरगम---- निघते की गायिकेचा आवाजही खुलतोच पण जीभ - ओठ, लिपस्टिक शिवाय लाल होऊन रूपही खुलते ते वेगळेच.चहा- कॉफी इतकीच सुपारीही थोडी उत्साह वर्धकच आहे .कष्टकरी माणसे त्यामुळेच.... ''जरा वाईच सुपारी काढा की हो ---पाव्हन ....! असे बोलून गप्पातील रंगत नव्या दमाने वाढवीतच बसतात.या सुपारीचीच एक लालसर चपट्या आकाराची एक बहिणही--चिकनी-- सुपारी म्हणून मिळते .नावा प्रमाणेच तिची चव काही वेगळीच .सुपारी काही लोकाना लागते त्यसाठी ती खमंग भाजूनही खाल्ली जाते .अगदीच सहन होत नसेल तर बडीशेप - लवंग -वेलची -जायपत्री -मिंट -जेष्ठ मध घालूनही ''सुपारी विना मसाला सुपारीला '' चांगलीच पसंती असते.थोड्या प्रमाणात खाल्ल्यास दातांचे आरोग्य सुधारते व-कृमी नाशक ही आहे .पण ''अती सर्वत्र वर्जयेत ''अन्यथा ती घसा-पोटातील आतडी यांच्या कर्क रोगासही कारणीभूत ठरू शकते.तेंव्हा जरा जपूनच रहा या --सुपारी पासून .सुपारीच्या खानडाचेही व्यसन-- नसणारेही काही--- महाभाग असतात या जगात .
कळीदार कपुरी पान कोवळ छान केशरी चुना /
रंगला काथ केवढा ,वर्खाचा विडा घ्या हो मन रमणा..//
बारीक 'सुपारी निम चिकणी' घालून /
जायपत्री वेलची लवंग वरी दाबून /
बांधले तसे या कुडीत पंच प्राण /
घ्या,रंगत करी मर्दुनी ,चतुर्दश गुणी ,सख्या सजणा...//
( राजा बढे --श्रीनिवास खळे --सुलोचना चव्हाण )
या -कर्ण मधुर लावणीतून -(गाण्यातून ) ....आपणास या त्रयींनी ..--''.पान-- सुपारीच्या '' स्नेह संबंधास एका वेगळ्याच
उंचीवर नेऊन ठेवल्याचे दिसते आहे .
तर आमच्याकडील -- ' सत्यनारायण -पान सुपारीचे ' तसेच त्यानंतरचे---- चहा पानास आग्रहाचे निमंत्रण आहे ........
चला तर मग ..........
------------------------------------------------------------------------- ( समाप्त ..)
.........................................
डॉ .अरविंद वैद्य
८,ऑगस्ट २०११
सोमवार
अमेरीका
..........................................

// फळांचा...... चापून घेतलेला समाचार ....!!! // -- ४ -- Apple
// फळांचा...... चापून घेतलेला समाचार ....!!! // -- ४ --
.................................................................................
// कर्मण्ये - वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ....!!-- असे म्हणतात .//
....................................................................................................

सफरचंद --४
..........................
'' सफरचंद '' याच्या नावातच-- सफर--असल्याने त्यास लांबून 'काश्मीर ' अथवा पाश्चिमात्य देशातून मार्ग काढत काढतच आपल्या पर्यंत यावे लागते.अन्यथा आपल्यालाच त्यांचे माय भूमीचे दर्शनानिमित्त विमान सफरीचा योग येतो .त्यास अर्थात '' चंद '' पैसेही खर्च होणार हे आलेच .दक्षिण व उत्तर धृवावरील जन्मजात खळ्यानमुळे त्याचा चेहरा - मोहरा अधिकच खुलून दिसतो .
''AN -- APPLE A DAY-- KEEPS THE DOCTOR --- AWAY ''.........
हे वाक्य देखील सारखे सारखे उगाळून ----स्वतः---प्रमाणेच गुळगुळीत झाले आहे . हे फळ-- हृदयाला जरी बलवर्धक असले तरी या- वाक्यांमुळे काही काही डॉक्टर मंडळींच्याच--- हृदयाचे ठोके------ कधी मधी चुकतात .यास्तव ही म्हण- म्हणे अभ्यासक्रमातूनच- वगळावी असे आपले म्हणणे पटवून देण्यासाठीचे व त्यासाठी उपोषण केल्याचे दाखले--- पौराणिक इतिहासाच्या - आधुनिक दाखल्यात पहावास मिळतात .परंतु वाटाघाटीनंतर ते उपोषण -''-सफरचंद ज्यूस''---पिऊनच संपवावे लागले. जगभर हे आंदोलन पेटू नये म्हणून काळजी घेतली गेली .त्यात काही सफरचंद ज्यूसचे व त्यापासून वाइन निर्मितीत गुंतलेल्या'' डॉक्टर ''मंडळींचाच हात असल्याचे आतील गोटातून समजले ..............................जोक्स अपार्ट --------------
सफरचंदे------ ही लाल -हिरवी -पिवळी -मरून-व लाल पिवळी अश्या विविध रंगात आढळतात तरी त्यांच्यात वर्ण भेद असल्याचे ऐकिवात अद्याप तरी आलेले नाही . सर्वजण साधारण एकाच आकाराची व आंबट- मधुर चवीची असतात. मेंदू - हृदय -फुफुसे -पोट - आतडी -सांधे यांचे बलवर्धनास उपयुक्त असे हे फळ.शरीराच्या मध्यवर्ती- महत्वाच्या अवयवांची.. खुबीने काळजी घेते म्हटल्यावर डॉक्टरांची गरजच काय......? मात्र आर्थिक दृष्ट्या -उच्च वर्णीयांच्या आटोक्यात असतात ती फळे .त्यामुळे गरिबांना पेरू - बोरे असा अश्या.... रानमेव्याचाच आश्रय घ्यावा लागतो .
सफरचंद- --न कापताच ....आपले दात भक्कम असल्याची खात्री असल्यास खाता येते.त्यासाठी याचा उपयोग दंत मंजनाचे जाहिराततही केल्याचे दिसून येते त्यातूनही आपल्यास सृष्ष्टी आणि दृष्टी सौंदर्याचा लाभ होतो तो वेगळाच . इतरांनी ते सुरीने चार फोडी करूनच खाण्यात मजा आहे .त्यात बिया जरा बारीक व कमीच असतात .त्यामुळे टाकाऊ भागही तसा -कमीच त्यामुळे पैसे वसुलीची फुल ग्यारंटी .हे फळ - कापण्याची एक गोलाकार--चकती हल्ली मॉल मध्ये--- (बाजारात ) मिळते.उत्तर ध्रुवावर ती ठेवून थेट दक्षिण धृवामार्गे बाहेर काढायचा अवकाश की अनावश्यक भाग बिन बोभाट (बियांसहीत ) वेगळा होतो व फोडीही आकर्षक दिसतात व संपतात ही लौकरच . आजारी व वृद्धाना ज्यूस देणे उत्तम .कापलेले फळ उघडे ठेवल्यास रंग बदलतो यास्तव लगेच संपवावे .
हेच--- सफरचंदाचे फळ झाडावरून खाली पडताना पाहून '' सर एझ्याक न्यूटन''या पाश्चिमात्य शास्त्रज्ञाने गुरुत्वाकर्षणाच्या भौगोलिक -शास्त्रीय सत्याचे - नियमाचा असा - महत्वाचा शोध लावला .हेच फळ खावून---- म्हणे ''आदम व इव या प्रेमिकांचे प्रेम वाढीस व भरभराटीस - लागले अन जगाच्या इतिहासात भल्या मोठ्या पृथ्वीवरील--- लोक संख्येच्या..भू ---वरील अनेक ---गोलात रुपांतर झाले आहे. तीच्या स्वतःच्या - सुरक्षितते साठी व माणसांच्या प्रचंड --ओझ्याखाली वाकण्या पासून बचाव करण्यासाठी अजूनही ती अशी --- वण- वण फिरतेच आहे ----फिरतेच आहे------ ----सूर्योदयापासून---क्षितिजा पलीकडील ---- सूर्यास्ता पर्यंत --त्याच सफरचंदाच्या--?-- शोधात, त्याच्याच आकारात, - पण ----- भव्य अशा विश्व रुपात . ............................................................

....................................... अज्ञात -- तीर्थ यात्रा आभाळ गूढ वरती ......../
मागे ----वळून बघता डोळे तुडुंब भरती -------------- ( रमेश वैद्य- ---सुधीर मोघे ----रवींद्र साठे )
असे सूर काढीत .........................

आणि विशेष आनंदाची बातमी म्हणजे --'' आम्हाला ते भूतलावरच ''-- सापडलेही पण-- एक ----
- -'' छोटासा टवका तोडलेले सफरचंद ''
अश्या छायाचित्र स्वरुपात . आजच्या आय.टी.च्या ग्लोबल युगात ---A -for Apple ---ला एक वेगळेच संदर्भ आले आहेत .. हेच सफरचंद- छायाचित्र ''ब्र्यांड '' म्हणून वापरणाऱ्या या कंपनीने -Apple हे बुद्धीवर्धक असते याचा पुरावाच आपल्या पुढे ठेवला आहे .व त्यांचे संगणक --मोबाईल्स -आय पोड्स -आय नोटबुक्स -आय बुक्स या पंच ज्ञानेंद्रिया रुपात . असंख्य ग्राहकांना त्याचा आज फायदा होत आहे .घर बसल्या जगातील कानाकोपर्यातील इत्तमभूत माहिती त्यांना एका क्लिक चे सहाय्याने मिळत आहे.'' हे विश्वची माझे घर '' या स्मृतींनाही मोठा उजाळा मिळत आहे .
-------- एका जगप्रसिद्ध -अशा ऑपरेटिंग सिस्टीम व हार्ड वेअर कंपनीच्या ल्याप टोप चे -Apple हे नाव म्हणून उदयास आले आहे .हे सर्व श्रुत- आहेच . * हे सफरचंद म्हणजेच --गुरुत्वाकर्षण- शोध लागल्याच्या आनंदाच्या भरात =न्यूटनने त्याची मधुर - चव घेऊन पहिल्याचा पुरावा. हेच.. जगासमोर आलेले *सफरचंदाचे पहीले अधिकृत-छायाचित्र होय. * हा शोध - निबंध आम्ही -( लेखकाने )कंपनीस सादर करून त्यांचे- पेटंट- घेण्याचा मानस व्यक्त केला असता त्यांनी ते गुप्तपणे-पण प्रांजळपणे मान्य केले आहे व लवकरच त्या बद्दल -- अमेरिकेचे पहीले - '' ई -अंब्यासडार ''चा किताब मिळणार आहे.हा पुरस्कार मिळविणारे ते पहीले च भारतीय -पुणेकर -मराठी -त्यातही महाराष्ट्रीयन -नागरिक असणार आहेत याची नोंदही ''गिनीज बुक रेकोर्ड मध्ये होणार आहे.हा पुरस्कार वितरण अमारंभ --Apple - कंपनीचे प्रवेश दारातच आयोजित केला जाणार आहे .'' टवका तोडलेले ई -Apple -व उबदार ई -शाल '' देवून होणार आहे .त्यांचे ई - प्रक्षेपणही ही होणार आहे . सर्वांनी आवर्जून हा कार्यक्रम पहावा अशीच ई-पूर्व सूचना देत आहोत .लक्ष असू द्यात .तसेच एका पुरुषाच्या यशा मागे एक स्त्री असते याची खात्री झाल्याने आमच्या -सौ .जयश्री वैद्य यानाही त्यावेळी ई -रिंग देवून गौरविण्यात येणार आहे .याचाही विशेस आनंद आहे.त्यांना अन मला ......सुद्धा .
विशेस म्हणजे ''ऑक्सफर्ड च्या पी. एच .डी .''- पाठोपाठ -अवघ्या दहा महिन्यात '' हा" पुरस्कार मिळविणारेही ते पहीलेच पुणेकर- मराठी - भारतीय नागरिक आहेत याचा सर्व पुणेकरांना (...आमच्या सह )-- अभिमान आहे.
(.. एक टवकारलेल्या -----स्वप्नमय जगताची..फ्यान्टसी ' सफर '--( चंद )--)
त्यावरच ------तूर्त समाधान मानू यात .........!!----कसे ...OK
टेक केअर --अन्ड Have -- '' An Apple A Day.''
किती --सांगू मी सांगू तुम्हाला आज-- आनंदी आनंद झाला .................//
आणि आम्ही ''टब ''-----ऐवजी ---अंगणातील पावसात नाचू लागलो ............//
..
..
.......................................
डॉ अरविंद वैद्य
अमेरीका
७ ,ऑगस्ट २०११
रविवार
........................................
.
फळांचा...... चापून घेतलेला समाचार ....!!! // -- 3
// फळांचा...... चापून घेतलेला समाचार ....!!! // -- 3
.......................................................................
// कर्मण्ये - वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ....!!-- असे म्हणतात .//
.....................................................................................................
* * * केळ .....3
...............................
'' केळ '' --खायला असा वेळच कितीसा लागतो म्हणा त्यामुळे अगदी आज कालची मऊशार -- चोकलेटची वडी खावी त्या वेळातच त्याचा फडशा पाडता येतो . त्यसाठी....'' वेळ'' नाही असे म्हणणारी व्यक्ती मला अजून तरी भेटलेली नाही.इतके सहज सोपे -विना बियाचे असे हे सर्व सामांन्यांच्या आवाक्यातले-- एकमेव फळ असावे .मधुर अशी एकच चव थोडी कमी अधिक प्रमाणात त्याची असते .रूपही गोजिरवाणे ,आटोपशीर हलके फुलके .पण वेळेला २-४ केली खाली तरी भूक भागून जाईल एव्हडी ताकद त्यात नक्की असते .त्याचा हंगाम म्हणाल तर----- बारमाही पिकासारखाच असतो .बरे भावही--- जास्तीचा खात नाही कधी .इतर फळांचे मानाने सर्व सामान्यांना परवडणारे व चांगलेच असल्याची खात्रीही बाह्य रुपा वरूनच मिळते .ह्याला रंग रूपही फार नसते .सुरवातीला कच्च्या स्वरूपातील हिरवे व नंतर हळू हळू पिवळे होत जाणारे .व गोडी वाढल्याची सूचना तो अंगावर छित्री डॉट ची... मेंदी काढून सांगून मोकळा होतो .ह्या मनमोकळ्या स्वभावाने सर्वांचाच ते फळ आवडते असते .झाडावर सरडा आपले रंग-- झटपट बदलतो पण याची याबाबत मंदगती चाल असते .

पूजा आदी धार्मिक विधी उपासतापास यावेळेला '' केळ '' म्हणजे एक हुकमी एक्काच असतो .त्याची उपस्थितीही प्रार्थनीय असते. अहो आपण नेहमी झटपट खाणारा शिरा वा उप्पीट-- डीश भर खाल्ला तरी पोट भरत नाही.पण-- केळाच्या-- परीस स्पर्शाने त्याच एरवीच्या --गोड शिऱ्याचा - सत्य-नारायणाचा -''-प्रसाद -''-होतो .त्याच्या लहानश्या- द्रोणातील अस्तित्वाने- अन शुद्ध तुपाच्या चवीने-- मन आत्मिक समाधानाने भरून जाते व त्यातही अनेकजणांना आपण सामावून घेतो .केव्हडे हे -असामान्य ..संग महात्म्य. दुधाच्या मैत्रीने त्यांचे ''शिक्रणात ''रुपांतर होते. तर- कस्टर्डच्या सानिध्याने ते -''-फ्रुटस्यालड ''--अश्या झोकदार- नामकरणाने --' टाय 'घातलेला जंटल- मन होऊन जाते अन--- पंच तारांकित हॉटेलमधील मेनुतील-डेझर्ट -सेक्शन- मध्ये स्थलांतरित होते व वेगळीच किमती- उंची ही गाठते .

.दाक्षीणात्य लोकांमध्ये केळाचे----- 'वेफर्स 'हा खारा-- पदार्थ लोकप्रिय आहे .त्यामध्ये मात्र तो आपल्यातील-'' कडकपणा''
प्रथमच लोकांपुढे आणतो कारण त्यालाही बरेच दिवस-- टिकून राहायचे असल्याने --'' कडक'' तेलाच्या सहाय्याने आपोआपच'' वाण नाही पण गुण लागतो '' तसे होते. याचेही काही-- खुजे भाऊबंध आहेत त्यांना ''सोनकेळी'' संबोधले जाते .ती तर नेहमीच्या केळ्यानपेक्षा अधिक गोड असतात म्हणूनच लहानमुलांना माझ्या ''सोन्या '' असे म्हणत असावे बहुतेक .एके काळी--पेशव्यांचेवास्तव्य असलेले --छोटे - वसई हे गावही ..केळ्यांसाठी प्रसिद्ध होते आता तेथेही सिमेंटची जंगले वाढल्याने वसई करांना सुद्धा आता जळगाव व इतर ठिकाणच्या केळांची--वेशीवर आतुरतेने वाट पहावी लागत आहे अशी अवस्था आहे .
लहान लहान केळीचे--- खुंट सत्यनारायणाचे धार्मिक - पूजेला चौरंग सजविण्यास लागतात.तसेच लग्न समारंभाचे वेळेस मोठे खुंट - प्रवेश द्वाराशी उभारतात.त्यामुळेही वैवाहिक आयुष्यास-- बळकटी येत असावी .केळ्याचा भरभक्कम बुंधा -- झाड तसेच केळ्यांच्या घडांचा भार आणि लांब रुंद डोलणाऱ्या पानांचा-- तोल भक्कमपणे सांभाळत असल्याने त्यास ''खुंट '' म्हणत असावे .आपणही व्यवहारात एखादी गोष्ट पक्की करून घेण्यास ''अगदी खुंटा हलवून बघितला ''--- असे म्हणतोच ना. केळीची- हत्तीच्या कानाप्रमाणे झुलणारी पाने आतील फळांना उन- पावसा पासून जपतात .ह्या पानांचा उपयोग -शाही जेवणावळीतही करतात .या हिरव्याकंच पानावर मांडलेले सात्विक गोड-धोड -भोजन- सुवार्णालंकार -ल्यालेल्या नववधू प्रमाणे नेत्र सुख तर देतेच पण जिव्हा सुखाने दोन घास जास्तीचे जावून उदरभरण ही ..चापून होते .
झाडावरील केळ्यांच्या समूहास'' घड '' म्हणतात तर गाडीवरील लहान समूहास'' फणी '' म्हणतात .अशी फणी शुभ कार्यात शोभून दिसते .उपवर मुलींच्या ओटीतही अशी फणी घालण्याचा प्रघात आहे .......काही म्हणा या केळ्यांच्या देखणेपणातच एक वजनदारपणाही जाणवतो तो काही वेगळाच.रुबाबात आरामखुर्ची टाकून ......समुद्रकिनारी ओळीने हवा खात बसावे तसा .
पण एकदा का ती------मऊशार- खुर्ची सोडली तर त्या सालीची अवस्था मात्र--- '' सैर भैर'' होते अगदी खुर्ची गमावलेल्या--- राजकीय पुढाऱ्या प्रमाणे , ( केळाची --साल-- काहीशी- हलकी- फुलकी व केळ खावून झाल्यावर मात्र लगेच लेची पेची अन नकोशी होते ).पण त्याही अवस्थेत आपल्या योग्य त्या मानाच्या -जागेच्याच -अपेक्षित असते ---'' सालीची '' - योग्य ती ' बडदास्त 'ठेवली नाही व तिला योग्य ते '' मानाचे '' सुरक्षित स्थान-दिले गेले नाही व ........ पायदळी तुडविण्याचा प्रयत्न केलातर , -------ती सुद्धा---- भल्या भल्यांना--'' आस्मान ''दाखविल्याशिवाय रहात नाही हे .....मात्र अवश्य ध्यानी असू द्यात म्हणजे झाले .
..... तू-- जपून टाक पाऊल जरा ....जीवनातल्या मुशाफिरा /-----!!
---या गाण्याची अन माझीही नीट --'' आठवणही ''- ठेवा एव्हडेच सांगते बिचारी ....''.ती केळ्याची साल .''
....................................................................................................................................................................
डॉ. अरविंद वैद्य
५ ,ऑगस्ट २०११
'' शुक्रवार ''
फळांचा...... चापून घेतलेला समाचार ....!!! // -- 2
// फळांचा...... चापून घेतलेला समाचार ....!!! // -- 2
.......................................................................
// कर्मण्ये - वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ....!!-- असे म्हणतात .//
.......................................................................................................
.......................................................................
// कर्मण्ये - वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ....!!-- असे म्हणतात .//
.......................................................................................................
आंबा---२
..........................
नाच रे मोरा ----''आंब्याच्या '' बनात नाच अश्या बाल गीता पासूनच आपली नि- आंब्याची ओळख होते .बालमित्रच तो .त्याला विसरणे शक्यच नाही .परंतु मोठे झाल्यावर तो ही आपल्याला विविध कारणांनी पारखा होतो व वर्षातून एकदाच कधी काळी मात्र आवर्जून भेटतोच भेटतो,तसेच--- आंबाही मुलांना न चुकता त्यांना सुटी पडण्याच्या उन्हाळी मोसमातच भेटण्यास येतो व पाऊस येई पर्यंत मनसोक्त खेळत रहातो .त्यामुळे मुलाचं तो जिवलग मित्रच असतो .
मोर हा तर आपला राष्ट्रीय पक्षी -- नयन मनोहारी पिसारा डोक्यावर तुरा,लांबलचक पिसारा मोठा राजशाही थाटच जणू .
म्हणजे राजाच ---तोही फळांच्या -- राजाच्याच आमराईत आनंदाने नाचतो .काय योगोयोग पहा .पावसा पूर्वी ढग जमा होतात त्यावरून पावसाचा अंदाज शास्त्रज्ञ बांधतात .तसेच आंब्यालाही ''तूऱ्या प्रमाणेच दिसणारा मोहोर येतो .शेतकरी -बागायतदार खुश होऊन आपल्या आंब्याचा पिकाचा अंदाज घेतात .थंडी संपत येते तसा आंब्याच्या पिकाला बहार येतो .
आंब्याचे झाड दारी असणे म्हणजे ते एक स्वप्नवत असते .
असावे घर ते आपुले छान --!!
पुढे असावा बाग बगीचा
वेळ मंडपी जाई जुईचा
'' आम्रतरूवर '' --मधु मासाचा
फुलावा मोहर पानोपान ---------असावे ..........

(पी.सावळाराम -दशरथ पुजारी --सुमन कल्याणपूर )
वास्तू शांती - पूजा -अथवा कोणतेही शुभ कार्य म्हटले की आंब्याची डहाळी - पाने हमखास हवीतच .मांगल्याचे प्रतीकच .
आंब्याचा आकारच साधारण माणसाच्या '' हृदया'' प्रमाणे असतो .त्यामुळेच तो प्रत्येकाच्या मनात घर करून रहातो व '' हृद्य '' असा बनतो .
त्याचे रंग रूप उगवत्या --सूर्याला साजेसे असे ''मोहक '' असते .आगमनालाच मात्र तो फार-- भाव --खाऊन जातो .फक्त उच्चभ्रू लोकच त्यांचे दर्शन घेण्यास धजावतात .इतर -मात्र वर्तमान पत्रातील फोटो पाहूनच -दुरून डोंगर साजरेचा अनुभव घेतात .हळू हळू तो चोर पावलाने दबकत बाजारात येतो .
ऐन तारुण्याच्या --भरात आणि भाराने लहान थोर -तीच्या मोहक हिरव्या कंच तोंडला पाणी सुटणाऱ्या अवस्थेने मोहात पडतात . ''कैरी '' नावाने तो - नावारूपास येतो .कैरीच्या पन्ह्याने उन्हाळ्याची चाहूल लागते .चैत्र - मासाचा आरंभ होतो . हळदी कुंकू समारंभ - भिशी पार्टी - पुष्करणी अथवा कल्याण -भेळे मध्ये आवर्जून तिची हजेरी असते.कैरीची डाळ --म्हणजे तर खमंग फोडणी देवून चापण्याचा मोह आवरत नाही.अशी एकेक पायरी चढत तो -- अंतिम '' हापूस पायरी '' च्या पदवी पर्यंत पोहोचतो.
सर्व सामान्यही आपापल्या मुलांच्या परीक्षा तर महिला उन्हाळी कामे उरकण्याच्या बेतात असतात .*अक्षय तृतीयेच्या --मुहूर्तावर -आंब्याचा --आम जनतेच्या घरात मात्र पूजा करून प्रवेश होतो .तो पर्यंत त्याच्या गोडीत --आणि कोकणातून भरभरून येणाऱ्या - गाडयात --वाढ होत राहते.थोड्याच अवधीत तो मग --केळी- द्राक्ष यांच्या हातगाडीवरील जागेचा ताबा-- हक्काने घेतो सर्व बाजार पेठ -सुगंधीत अन रंगीत करून सर्व सामन्यांवर मोहिनीच घालतो जणू .घरोघरी -आमरस पुरीचे बेत सुरु होतात .आणि वेगळीच बहार येते.सर्व गाव भर एखाद्या-- वळू -- प्रमाणे धुमाकूळ घालतो.करंड्या -लाकडी पेट्याच्या वाहनात बसून ऐटीत घरोघरी पोहोचतो . शहरातील ओसंडून कचरा पेट्याही त्याची साक्ष देत रहातात .
दुकानांवरील येथे ''रत्नागिरी हापूस मिळतील ''व त्यावरील मोहक भुरळ पाडणारे चित्र पाहून पावले आपोआपच दुकानाकडे वळतात.व हापूसचा वेध नव्हे वास घेऊ लागतात.काही व्यापारीतर खास ''देसाई आंबेवाले --बेहेरे आंबेवाले ''अश्या थाटातच प्रसिद्ध आहेत .त्या आता नव्याने भर पडली ती अल्पावधीतच -- रेडीओ मिरचीच्या खुश्कीच्या मार्गाने - घरोघरी थेट किंचन टेबलवर जाऊन बसलेले ''म्यान्गोवाले डॉट. कॉम हे नव्या दमाचे ..घराघरात आकर्षक बॉक्स मधून घरपोच डिलिव्हरी देत पोहोचलेले नाव.
कार्पोरेट जगतात ही-- तो-- आता आपली वाट --आकर्षक रंगीत बॉकस द्वारे साहेबांचे थेट ए.सी.केबिन मध्ये जावून शोधतो ..व्यापारी मंडळी... ''आम्र मोहोत्च्सव '' भरवून मोठ्या धूम धडाक्यात त्यास लोकांचे दारा पर्यंत तर अगदी सामन्यांच्या खिशा पर्यंत पोहोचवतात.मे -महिन्याचा उकाडा याचे अस्तित्वा मुळेच सुखावह होतो .आईस्क्रीम चा रंग आणि नूरही पालटतो.आम्रखंड - आम्र शिरा -नव्हे तर आम्र मोदक ही जेवणावळीत दिसू लागतात .----सर्वांची मने तर जिंकतोच पण व्यापार्यांच्या ध्यानी - ----मनीची ---चिंताही दूर करतो .हल्ली तर काही तरुण उदयोज्कांनी --- ई- मेल जगताचा फायदा घेत ,ऑन लाईन बुकिंगची व्यवस्था करून आंब्याला घरपोच सन्मान पूर्वक व आस्थेने पोहोच करण्याची व्यवस्था केली आहे .एव्हडेच नव्हे तर --परदेशस्थ -इंग्लंड - अमेरीका येथील सग्या -सोयर्यानाही म्यान्गोवाले डॉट कॉम वाले --४--५ दिवसात आंबे पोहोच करण्यात यशस्वी झाले आहेत . कोकणचा हापूस -पायरी आता थेट वाशिंग्टन - क्याली फोर्नियात आरामात पोहोचतो आहे .
अश्या प्रकारे थोड्या अवधीतच ...जगभराचा कानोसा घेतो .आपले भाऊ बंध -देवगड - कर्नाटक - मद्रास -लंगडा-तोतापुरी -केसर - गावठी -आंबा यानाही थोडी वाट मोकळी करून देत --तो ,धावपळ करून दमल्याने परतीच्या मार्गाला लागतो .तो सर्वांनाच हूर हूर लावून जातो पण त्यापूर्वी वर्ष भराचे सोबती साठी ...उरल्या सुरल्यांना घेऊन निर्वात कॅन व बाटल्यांमध्ये --पल्प --स्वरुपात पिवळ्या - केशरी रंगांत बंदिस्त होतो व--- फ्रीजची --थंडगार हवा खात निवांत बसतो .
अन मागाहून येणाऱ्या आपल्याच बोजड रुपामुळे - कासव गतीने येणाऱ्या हिरव्या रंगाच्या -- भाऊ बंधांना-शिक्षा करतो. कच्च्या स्वरूपातच-- सुऱ्यावर चढवून ---महिलांचे ताब्यात देवून मोकळा होतो . त्याही त्यांचा तिखट - मीठ तेल --- लावून चांगलाच समाचार घेतात . अन चवदार होण्यास मात्र त्याची-- चीनी मातीच्या --अंधार कोठडीत रवानगी करतात.-- प्यारोल-- वर बाहेर येण्याची संधीही वर्ष-भर अधून मधून मोकळी हवा घेण्यास मिळत राहते.
कवी महाशय मात्र -------
आला ग बाई आला ग बाई आला ---
पाडाला---------- पिकलाय आंबा ..
वास बघुनी तुम्ही जाणा हो पाव्हन
नमुना बघून तुम्ही जाणा हो पाव्हन .....
आंब्याचा रंग केशरी
वर लांब शोभे शेंदरी
तोंडाला तुझ्या पाणी सुट
घेवून टाक लगी म्हंजी काळजी मिट.....
घुटमळू तू नग ..बाबा
पाडाला पिकलाय आंबा --------------------
( गीत ,संगीत- तुकाराम शिंदे ----- स्वर- सुलोचना चव्हाण )
अश्या स्वर मधुर गाण्याच्या ...सुरा द्वारे केंव्हाही त्या रसाळ आंब्याची -''आभासी'' भेट घडवून आणतात .हेही नसे थोडके .
अन एव्हाना आपली नजर चुकवून ---- '' मोरही '' --पावसाची-- ढगाळ चाहूल -लागल्याने आपल्या-- प्रेयसीच्या शोधात आंब्याचे वनात धूम ठोकून, पिसारा फुलवून मुक्तपणे आमराईत नाचत नाचतच वनविहार करण्यास केंव्हाच पसार झालेला असतो.......
.........................................................................
डॉ.अरविंद वैद्य
३ ऑगस्ट २०११
* बुधवार *
Subscribe to:
Posts (Atom)