Wednesday, May 25, 2011

// अमेरिकेतील वाटचाल // ५

     आमचे पाहिले औटींग
 Harpers Ferry---National Historical Park
          West Viriginia--,Maryland,---Virginia        ******************************************************************** 
            येथील शिरस्त्या प्रमाणे विक एंड ला शनिवारी सकाळीच नाश्ता करून व दुपारच्या पोट पुजेची व्यवस्था बरोबर घेऊन निघालो .
            दिमतीला  ----Mitsubishi-- Verginiya-XMS-2100 कार होतीच .प्राजक्ताने ड्रायविंग सीटची तर बाजूस ''गाईड ''म्हणून मिलिंद होताच .मागे आम्ही
            '' जेष्ठ नागरिक '' व मिलिंदचा एक मित्र ......स्वप्नील कार्येकर एक बडबडे व्यक्तिमत्व .
            सकाळच्या प्रसन्न वातावरणात--- कारने आपली मार्गक्रमणा लांबवर पसरलेल्या रस्त्यावरून सुरु केली... .आणि यथोचित असे -----पल पल पल
            -- हरपल हरपल--- कैसे कटेगा  --पल-- हरपल-हरपल ---या सुमधूर गाण्या सोबत रस्ता मागे पडू लागला.दुतर्फा हिरव्या गार गवताच्या गालीच्या मधून पसरलेल्या रस्त्यावरून पळणारी कार---- Harpers Ferry---National Historical Park -------जवळ केंव्हा आली हे कळले देखील नाही .
            आपली कार पार्क करून तेथील मोठ्या गाडीने आत गर्द झाडीतून दूरवर सर्वाना घेऊन जाण्याची उत्तम व्यवस्था होती .
           डोंगर दऱ्यातून खळ खळ वाहणाऱ्या  Shenandoah   आणि  potomac  या नद्यांच्या संगमाच्या व सभोवतालच्या  दरीमधील विलोभनीय अश्या थंड वातावणात आपण येऊन पोहोचतो.येथून पाऊल वाटेने विस्तीर्ण पसरलेल्या सभोवतालच्या पार्क मध्ये  भटकंती सुरु केली .

            हे पार्क म्हणजे --जॉर्ज वाशिंग्टन --अब्राहम लिंकन    यांनी  प्रस्थापित  केलेली  त्यावेळच्या   ''अम्युनिशन फ्याक्टरीचा परिसर ''.येथेच युद्धास लागणारा दारुगोळा  व बंदुका तयार होत असत.त्याची माहिती म्युझियम मधून आजही जपून ठेवली आहे .आजू बाजूस टुमदार वसाहत ,.डोंगर माथ्यावर चर्च, उंचावरून दिसणारा नयन मनोहारी असा परिसर पाहून  आनंद दुणावतो

            अश्या वातावरणातच झाडाखालील असलेल्या बाकावर बसून वनभोजनाचा आस्वाद घेतला.अन पुनश्य   नव्या उत्चाहात  मेरील्यांड ----वेस्ट वर्जिनिया-----वर्जिनिया या तीन विभागांचा दुवा असलेल्या नदीकाठी भटकंती करून तेथील आईस्क्रीमची मजा चाखत....  तेथील आठवणी मनात साठवून सायंकाळी आकाशात  उडणाऱ्या पाखरान समवेत आम्हीही  घराकडे परतलो .

// अमेरिकेतील वाटचाल // ५


// अमेरिकेतील वाटेवर // ४

  ''अक्षय तृतीया ''
                              
  ६ मे २०११

                  काल पावसाने सकाळीच  सगळीकडे -----सडा शिम्प्ल्याने  वातावरण  थंडगार झाले होत थोड्यावेळाने 'सोनेरी उन  'पडल्याने बाहेर फेर फटका मारला .दुपारी दारामध्ये पुण्याहून अभिजितने ( Rainbow international) मार्फत पाठविलेल्या  म्यान्गोवले डॉट कॉम चे ------आंब्याचे पार्सल मिळाले .

                  मनामध्ये ,............आंब्याचे वनात 'मोर ' नाचावा  त्याप्रमाणे आनंद झाला .देवगड हापूस ---   उद्या अक्षय तृतीयेच्या मु'हूर्तावर  तोही दूरवरच्या...... अमेरिकेत चाखावयास मिळणार याचाच खूप  आनंद  झाला ..

                 सायंकाळी घराजवळील------ Fairfax park ला भेट दिली .तळ्याभोवती हिरवेगार गालिचे झाडांच्या फेर्यात पहुड्ल्या प्रमाणे  दिसत होते .फोटोचा मोह आवरता आला नाही.ठिकठिकाणी लाकडी बाके .... वन भोजनास येण्याऱ्यांचे दिमतीला असतात .मांसाहारी खवैयांसाठी लोखंडी  ''ग्रील '' देखील ठेवण्याची दखल येथे घेतलेली दिसली .तेथील विशाल संथ  तळ्यामध्ये एक दोघे मासे मारिचा           ( fishing ) आनंद घेत होते. अंधार पडू लागला तश्या पार्क मधून कार्स बाहेर पडू लागल्या , तसे त्यांच्या दिव्यांमुळे ........एखादे' काजव्यांचे मोहोळ' बाहेर पडावे असे भासत होते .आणि   वर .... छानशी  छोटीशी -----''द्वितीयेची  चंद्रकोर '' निरभ्र आकाशातून बाहेर डोकाऊन पाहू  लागली.

                 अश्या प्रकारे  येथील एक ............रम्य सायंकाल ...........  अस्तास  गेली .
                 ______________________________________________________

                 आज अमेरिकेतील  वाशिंग्टन मधील ---पहिली  वहीली--अक्षय तृतीया. सौ .जयश्री व सौ .प्राजक्ताने (.सासू -सुनेने )देव कार्याची यथोचित तयारी उत्चाहात केली.गणपतीची ---देवीच्या आरतीने  व सुगंधी उदबत्तीने घरातील वातवरण ,प्रसन्न झाले. देवांची नवी वस्त्रे नवे आसन सारे यथास्थित पार पडले  व आजच्या मिष्टान्नाने येथील साडेतीन मुहूर्तापैकी  एकाची  मुहूर्तमेढ झाल्याने सगळा माहोल मंगलमय झाला .व विक एन्डच्या........ उद्याच्या  औटींगचे बेत ठरू लागले.

* अमेरिकेतील वाटेवर * ३

                      वाशिंग्टन डी सी ---  Dulles विमानतळावरून घरी जातानाच अमेरिकेच्या रस्त्यावर वावरताना पहिला फरक जाणवला तो म्हणजे डाव्या बाजूस  असणारे कारचे  '' ड्रायविंग सीट  ''  डाव्या बाजूने जाणारी व उजव्या बाजूने येणारी  वाहतूक .प्रशस्त  चकाचक रस्ते -- सिग्नलच्या दिव्यांचे  लांबलचक आडवे खांब व रस्त्याचे कडेला असलेले दिव्यांचे उंच असे खांब.बाकी सर्व आकाश मोकळे मोकळे भव्य  दिसते .आपल्या सारख्या लाईटच्या तारांचे जाळे ,भले मोठे होर्डींग्स ,जाहिरातींची भाऊ गर्दी येथे  अजिबात नसते .

                      त्यामुळे भव्यता जाणवते . आणि --------------फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश------- या गाण्याची प्रकर्षाने आठवण येते.
                              
                      मिलिंद -प्राजक्ता रहात असलेली -Herendon-Little current DR  (DRIVE) HE छोठे खानी दुमजली अपार्टमेंटची वसाहत ,सुबक आखीव रेखीव पार्किंगची व्यवस्था ,सभोवती हिरव्या गार झाडांची फौज .प्रत्येक इमारतीवर त्यांचे नंबर्स ,दारावर फ्ल्यातचे नंबर्स   आमच्या अपार्टमेंटचा नंबर --2444 व फ्ल्याट क्रमांक --- 4442 असा वैशिष्ठ्य पूर्ण आहे .सर्व फ्ल्याट एकसारखे आतून बाहेरून पांढऱ्या शुभ्र रंगाचे,.... लाकडी जीने,.....एक वेगळाच रुबाब दिसतो.
                                                          
                      या  घराची व्यवस्था --- आत शिरताच डाव्या बाजूस किचनची व्यवस्था  डाव्या  कोपऱ्यात. दिवाणखाना व नंतर २ बेड रूम्स .दिवाणखान्याला लागून छोटी ग्यालरी.कॉलनीच्या मध्यभागी छोटेसे पटांगण--लहान मुलांना खेळण्यास झोका ,घसरगुंडी ,स्विमिंग पूल प्रशस्त आवार.चालण्यासाठी सिमेंट कोन्क्रीतचा हिरवलीभोवतीचा  छानसा वळणा वळणाचा रस्ता .

                      आपल्याकडे सध्या टाउन शिप कॉलनीत असा प्रकार पहावयास मिळतो. इंग्लंड च्या तुलनेत येथे रस्ते -दुकाने --पार्किंग --कार्स सारे  काही प्रशस्त असे दिसून येते .काचेची तावदाने असलेल्या  भव्य कार्यालयामध्ये सर्रास  रात्रभर दिवे  चालूच असल्याचे आढळतात .सगळीकडे नैसर्गिक हिरवळ मात्र आवर्जून पहावयास मिळते त्यामुळे डोळ्यांना आपोआपच थंडावा मिळतो .......
                                                                                                                                                                क्रमशः

Monday, May 23, 2011

अराउंड द वर्ल्ड ......

'' देखी है ........ सारी दुनिया --- जापानसे लेके ---------- रशिया
                             
                                                   ऑस्ट्रेलियासे ---------------लेके  ........अमेरिका // ''

                                                             मेड इन इंडिया ----  प्यारा सोनिया 'एक  दिल चाहिये 
         
                                                                                                       ----बस्स -------- ????

                                            हे गाणे प्रत्यक्ष्यात म्हणता...... येण्याची तयारी जोरात सुरु झाली आहे .अलिशा चिनॉय चे हे फेमस गाण्याने आज स्फूर्ती आली आहे .

                                           '' आधी कळस मग पाया ''------ या नेहमीचा मार्ग न अनुसरता.  इंग्लंड पासून ----अमेरिके पर्यंत तर मजल मारली आहे .अर्धी लढाई तर पूर्ण   झाली आहे . म्हणतात ना......Thousand miles journey starts with one step ahead .

                                              खरेच आपले भौगोलिक ज्ञान प्रत्यक्षात ........उतरविण्याची उत्तम संधी म्हणंजे जगभराचा प्रवास करण्याची मानसिक  व आर्थिक तयारी करणे .भूगोलाच्या नकाशा वरील तीम्बांच्या  शहराचे  विशाल दर्शन घडण्यास विमानप्रवास हा छान पर्याय आहे .पाहूया कसे जमते ते . Lets hope for the Best.--------Will will find a way--------- !!!!

                                               सगळ्याची  पूर्व तयारी म्हणजे ---पासपोर्ट --व्हिसा  ---आणि  फायनान्स.
चला तर मग तयारीला लागा .विमान कंपन्या आपल्या स्वागतास उत्सूक आहेतच .
घस घशीत सवलत देण्यास .
                                                                                                 चला भेटू या तर ---

अमेरिकेच्या वाटेवर ---( २ )

                              दोन महिन्यांच्या प्रदीर्घ पूर्व तयारी नंतर २७ एप्रिल २०११ दुपारी ४.३० वाजता  "Sandy's" च्या तवेराने सहार विमानतळाकडे प्रस्थान केले .सामान वगैरे चेकिंग थोड्याच वेळात झाले ,सर्व सामान व्यवस्थित नियमानुसार झाल्याने सुटकेच निश्वास सोडला  तब्बल ६  ब्यागा होत्या.LH-765 -विमानाने पहाटे १.१० ला  उड्डाण केले .भौगोलिक असा अरबी समुद्र ओलांडून आम्ही सकाळी ६ वाजता  ''म्युनिच ''जर्मनी येथे ५ तासांच्या ब्रेक साठी उतरलो .
                              
                              फ्रेश होऊन सभोवतालच्या भव्य वेटिंग एरियातिल  भव्य दुकानात आपल्या परिचयाची"जर्मनची भांडी "...... कोठे   दिसतात का ?हे पाहिले पण त्याचा मागमूसही दिसला नाही ------पिकते तिथे विकत नसावे --- बहुतेक ?

                               म्युनिच हे नवीनच विमानतळ आहे लहानमोठ्या विमानांची चहल पहल दिसत होती. डाव्या बाजूस विस्तीर्ण मैदानावर  रनवे व हिरवे गवताचे पट्टे असे अनोखे नेत्र सुख देणारे मिश्रण पहावयास मिळाले .त्यावर अलगद पणे उतरणारी विमाने  ''मोठ्या'' फुलपाखराप्रमाणे भासत होती .पुढचे विमान १ तास उशिरा सुटणार असल्याचे समजले .त्यामुळे पुन्हा एकदा  फ्रेश होऊन तेथेच पेपर्स वाचत वेळ घालविला

                                १२. ३० वाजता LH- 414  हे विमान  वाशिंग्टन डी सी  कडे झेपावले .अटलांटिक हा महाकाय महासागर उल्लंघून --'अमेरिकेतील वाशिंग्टन डी सी च्या ''डलेस '' विमानतळावर १० तासांच्या प्रवासानंतर  दुपारी ४ वाजता पोहोचलो.'स्वप्नवत '--वाटणाऱ्या व आतापर्यंत फक्त भौगोलिक परिचयाच्या अश्या अमेरिकेच्या भूमीवर  आमचे पहिले पाऊल  ठेवले व चंद्रावर उतरलेल्या चांद्रवीरांप्रमाणे  आनंद अनुभवला .

                                मिलिंद - प्राजक्ता स्वागतासाठी हजार होतेच .विमान तळाबाहेर पडताच विशाल अश्या पार्किंग लॉट मधून कार बाहेर काढली व अमेरिकेच्या उबदार कुशीत  ऐतिहासिक अश्या  HERNDON ,VA 20171 येथे  विसावलो देखील .

                                                   डॉ .अरविंद व सौ जयश्री
                                                                 वैद्य
                                                          '' मध्यंतरी ''

वाचाल तर वाचाल ................

   क्रियेवीण वाचाळता .......व्यर्थ आहे .....!!!!!
                             
खरोखरच कांही छोट्याश्या शब्दात भलामोठा अर्थ दडलेला असतो.  आज काल वेळ नाही हो वाचायला  ..असेच ऐकावे  लागते .
                                 आजच्या धावपळीच्या युगात मोबाईल वरील.... एस एम एस हीच खरी मूक --  बोली भाषा तयार झालेली दिसून येते आहे .
                                 मागील पिढी घडली ती... सुलेखन पद्धतीच्या लेखनाने . त्यामुळे अक्षर कसे बाळबोध वळणदार असे .त्यामध्ये एक जिवंत पणा --आपले पणा असे .पत्रलेखनातून....... तर ती विशेष खुलत असे. वाचतानाही ती .........मनाला भिडत असे .
                                  आणि हल्लीची तरुणाई रमली आहे ती ---ई-लेखनाच्या, ई-मेलच्या,  इनस्टंट कॉफीच्या ......वाफाळलेल्या क्षणभंगुर जगात .सर्व काही झटपट .....चटपट   आणि  पटापट च्या पायऱ्या ओलांडण्यात. त्यामुळे त्या लेखनात नि वाचनात एकसुरीपणा जाणवतो .सर्वच पत्रातील मजकूर एकाच  छापाचा. पण   ब्रेड --बर्गर च्या बाजारात त्याचाच बडेजाव चालतो आहे .याची प्रचीती येते .कालाय तस्मै:नमः !  दुसरे काय ?
                                  चुटकी सरशी क्लिक च्या चावीने उघडणारे ''गुगलचे विश्व ''जोडीला असल्यावर----- कशाचीच  चिंता नाही . त्यामुळे या नव्या विश्वात रमून घ्यावेच लागते .अन्यथा  प्रत्यक्ष्य'' लिहिता वाचता '' येत असूनही याची जोड नसेल तर ...संगणक निरक्षरचा... शिक्का ठरलेलाच.
याचे सहाय्याने आपण क्षणात जगाच्या या कोपऱ्यातून त्या कोनापर्यंत लीलया संचार करू शकतो .हे ही नसे थोडके .
                                   आणि या वाचून....... फार काळ दूर राहणे....... चालणारही नाही .चला तर आपणही या नव्या जगाच्या वास्तवात रममाण होऊ या .आनंद लुटूयात व नवा मंत्र जपूयात शिकाल तर वाचाल .......!!
 
डॉ.अरविंद व सौ .जयश्री  वैद्य
                              
           अमेरीका
                                     
 

Saturday, May 14, 2011

अमेरिकेच्या ''इस्ट '' वाटेवर

आमच्या आयुष्यतील  विमान प्रवासाची '' ह्यात्रिक '' यंदाच्या अमेरिकेच्या विमान प्रवासाने होत आहे .
याचा वेगळाच आनंद आहे .

                  वेळेच्या बाबतीत  भारताच्या  '' मागे '' राहूनही हा अमेरिका   देश एव्हडा आघाडीवर कसा आहे बर  ?...... याचा'' मागोवा '' घेण्याची उत्तम संधी    '' मिलिंद -प्राजक्ता ''    यांनी मराठी नव वर्षाच्या प्रारंभी   उपलब्ध करून दिली आहे .यासंधीचे '' सोने '' कसे करता येईल हेच आता पाहायचे आहे.    नाहीतरी या  सोन्यासारख्या संधीची '' चांदी '' झाली तरी आनंदी आनंदच आहे . 

                     प्राथमिक पण    कट - कटीची  '' पूर्व '' तयारी व्यवस्थित  पूर्ण झाल्याने, '' पश्चिमेकडील '' गोष्टींचा उलगडा यथावकाश सुलभ पणे  होईल   अशी खात्री आहे.

                    '' लुफ्तांझा '' या  कंपनीच्या LH - 765 * या फ्लाइटने दिनांक  .... २८ एप्रिल २०११ रोजी भल्या  पहाटे  मुंबई --- सहारा  वरून भल्या पहाटे    १.१० वाजता आमचे विमान अमेरिकेकडे प्रस्थान करेल .व '' २८ एप्रिल २०११ रोजी दुपारी ३ चे '' सुमारास अमेरिकेच्या भूमीवर  .....वाशिंगटन   येथे  आमचे ------ पहिले वहीले पाऊल पडेल .

                    सर्वच पहिल्या गोष्टींची उत्छुकता माणसाला असते तशीच  आमची अवस्था  झाली  आहे. .अमेरिका व  अमेरिकेतील आपले सगे-सोयरे यांच्या भेटीस आतुर..........!!!!!!!

                   टी.वी. वरील '' मृण्मयीच्या '' शब्दात सांगायचे  तर,  आता तर ......     ''लई भारी वाटतंय '' ........ !!!!!!!!!  ....आणि काय सांगू...?..

                   बाकी नंतर सर्व तेथूनच --- '' थंड '' डोक्याने   सुचेल तसे कळवूच.

                   अनुष्का - अश्विनी - मंदार यांच्या बरोबरच्या'' इंग्लंड ''अबिंग्डन  मधील मधुर  ''आठवणी '' धूसर होत नाहीत - तोच मिलिंद -प्राजक्ता बरोबर राहण्याचा व  अमेरिकेच्या प्रवासाचा ' दुग्ध - शर्करा ' असा  योग ४-५ महिन्यातच  लवकर  जुळून आला आहे.

                   आणि  नव्या पर्यटन '' अध्यायाचा '' शुभारंभ नव्या मराठी वर्षाच्या  प्रारंभीच आणि तोही   '' अक्षय तृतीयेच्या '' आगामी  शुभ मुहूर्तावर होत आहे यातच  '' अक्षय '' आनंद भरून राहिला आहे .

                                                                                           डॉ .अरविंद व सौ जयश्री वैद्य 
                                                                                                         '' अधांतरी  ''
                                                                                               *********************                                                                                                                      क्रमश: ......