Wednesday, June 22, 2011

// अमेरिकेतील --नव्हे जगातील उंच स्मारक //

 
                               साद--------- देती हिम  शिखरे----- शुभ्र पर्वतांची ---------/
                              हिमालय हा नैसर्गिक उंच पर्वत आहे .त्याची बरोबरी तर करणे केवळ अश्यक्य .पण माणूस हा मोठा कल्पक प्राणी आहे .तो आपल्या कल्पकतेने  निसर्गाची बरोबरी करू पहातो आहे.याची साक्ष म्हणजे ''वाशिंग्टन  येथील ''वाशिंग्टन मोन्युमेंट '' हे --- ५५५ फुट उंच--- संपूर्ण   मार्बल -ग्र्यानाईटचे --- येथील  लोकप्रिय महान योद्धा  -- जॉर्ज वाशिंग्टन  याचे  स्मरणार्थ उभारलेले  जगातील उंच  प्रसिद्ध  स्मारक .
                              देश मोठा--- की माणूस --खरे तर देशातील  थोरामोठ्या माणसांमुळेच तो देश आपोआप मोठा  होत जातो.लोकप्रिय  योध्याने----- ब्रिटन बरोबर झालेल्या युद्धात विजय मिळवून अमेरिकेस स्वतंत्र केले व अमेरिकेचा पहिला प्रेसिडेंट होण्याचा मानही पटकाविला .
                              वाशिंग्टन येथे आल्यावर या स्मारकाचे प्रथम दर्शन घेतल्यास त्यावरून  आपोआपच संपूर्ण वाशिंग्टन शहराचे गरुड भरारी -दर्शन घेता येते . फ्री एन्ट्री -असली तरी आपली तिकिटे व त्यास द्यावयाच्या भेटीची वेळ ठरवून घ्यावी लागते .
                              एका भव्य अश्या विशाल मैदानावर -- सभोवतालच्या हिरवळीवर उत्तुंग चौरसाकृती  संगम रवराचे स्मारक.वरील टोकाचा भाग निमुळता पिऱ्यामिड सारखा .  भोवती अमेरिकन झेंड्यानी अखंड  फेर धरलेला आहे .बसण्यासाठी संगमरवरी लांबलचक बेंच .आपआपल्या वेळे नुसार आत एन्ट्री मिळते .आत मधील ए .सी .लिफ्टमधून एका वेळेस १० -१२ जणांना वरपर्यंत घेऊन जाते. तेथून चारही बाजूचे अखंड  विहंगम दृश्य पाहण्यास जाड काचेची मोठी तावदाने.त्यामधून संपूर्ण शहराचे विहंगम नेत्र सुखद दर्शन उंचावरून पाहण्यास मिळते .

                              रात्रीचे अंधारात आजू बाजूची  सर्व मुख्य स्मारके दिव्यांनी उजळून निघतात .दिवाळीतील सुंदर भव्य किल्ला पहावा तसे भासते .एका बाजूस युएस कॅपिटोल---एका बाजूस व्हाईट हाउस '----तिसऱ्या बाजूस असणारे वॉर मेमोरियल अन लिंकन मेमोरिअल ,अन चौथ्या बाजूस जणू बेटावर असल्याचे भासणारे  पोटोम्याक नदीच्या-- कुशीतील '' रोनाल्ड रेगन  डी. सी. विमान तळ ..एका बेटावर असल्याचा भास होतो .विमानांचे ल्यानडिंग -व फ्लाइंगही किल्ल्यातील  चिमुकल्या विमानाप्रमाणे मोहक  दिसते .'' टायडल बेसिन '''हे बेसिनच्या आकाराचे मोठे तळे व सभोवती जपानी-- चेरीची बाग .
                              १८४८  ते १८८४ या काळात बांधल्या गेलेल्या व मध्येच फंड्स अभावी खंडित झालेले हे स्मारक त्यामुळे दोन रंगाच्या मार्बल मध्ये तयार झालेले दिसते .

                              हे स्मारक पहात असताना--  ब्रिटनचे आयकॉन असलेले ---''लंडन आयच्या ''पारदर्शक कॅप्सूल्स मधून पाहिलेल्या लंडन शहराच्या -  २००७ मधील सुखद  स्मृती जागृत झाल्या .
                                                               

                              दुसरी आठवण झाली ती-- १९८६ च्या --- ''संगे मरमरका --आग्र्याच्या ताज महालची .एक आहे शुभ्र धवल असे पत्नीवरील निस्सीम प्रेमाचे प्रतिक व कलाकुसरीचा असामान्य  नमुना तर  हे---- आहे  देशभक्तावरील पराक्रमाच्या --अभिमानाच्या उच्च पराकोटीची परीसीमा.आजही  ह्या स्मारकाचे रुपात-- ताडासनात-- उभे राहून जॉर्ज वाशिंग्टन आपल्या देशाच्या संरक्षणाची जबाबदारी अविरत  पार पाडत असल्याचे दिसते ,आणि '' मरावे --परी कीर्ती रुपी उरावे ''....!! या शब्दांना खरा अर्थ प्राप्त होतो तो यासारख्या देश प्रेमींच्या स्वार्थ त्यागाने .  

                                                              
                              मनसोक्तपणे--- वरील दृष्ये कॅमेऱ्यात साठवून ठेवत व डोळाभरून पहात वेळ कसा जातो ते कळतही नाही .जगातील एका ऐतिहासिक वास्तूच्या सहवासाची.... खुणगाठ मनाशी बांधून व--- पर्यटन खात्यात जमा करून  परतीच्या लिफ्टसाठी कांही पायऱ्या उतरून यावे लागते .खाली येताना त्या मनोऱ्याच्या आतील बाजूसही काही अप्रतिम कलाकृतीच्या कोनशिलेचेही दर्शनही गाईड आपणास दाखवीत असतो .खाली येऊन पुन्हा त्या वास्तूची------'' टोक केलेल्या पेन्सिली '' प्रमाणे दिसणाऱ्या प्रतिमेसह फोटो काढून त्या थोर स्मारकाचा आम्ही निरोप घेतला .आणि अमेरिकेतील एक रात्र -- ''अरेबियन नाईट ''च्या --- आविर्भावात  संपुष्टात  आली.

No comments:

Post a Comment