Monday, July 11, 2011

'' ४ जुलै ''--अमेरिकेचा स्वातंत्र्यदिवस '' अमेरिकेचा--- अचंबित करणारा इतिहास ....//

-- स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे व मी तो मिळविणारच ...! हा टिळकांचा करारी बाणा.
                 तर --अहिंसा परमोधर्म ---हा तर  गांधींचा - बालपणापासूनचा हट्ट..!
                             
                या दोन युक्तीच्या गोष्टींमुळे चतुराईने--- 'ब्रिटिशां पासून ' भारताला मुक्त केले .
                                              
                 त्यामुळेच --'' मेरा भारत महान ''....!! म्हणण्याची स्फूर्ती येते .

                अमेरिकेतील जनतेच्या दृष्टीने त्यांच्या   ---- स्वातंत्र्याचा हिरो

                '' जॉर्ज वाशिंग्टन ''

                George   Washington---- "first in war, first in peace, and first in the hearts of his countrymen
                " Historical scholars rank him as one of थे---- greatest United States presidents.''....!!
----महाकाय स्वतंत्र  लोकशाही  अमेरीका ...खंडाचा इतिहास जाणून घेताना या देशाचा - पांढरा -लाल -व नीळा या  
                  तीन रंगाचा ध्वज बरेच कांही सांगून जातो .झेंड्या वरील लाल पांढरे  एंकसारख्या रुंदीचे १३ पट्टे.... मूळ अमेरिकन  वसाहतींचे दर्शक आहेत .तर कोपऱ्यातील  निळ्या रंगाचे चौकोनातील ५० पांढरे  स्टार्स हे या देशातील राज्यांची संख्या दर्शविते. स्वातंत्र्य - समता आणि बंधुता या त्रिसूत्रीवर अमेरिकन जीवनपद्धती आणि मानसिकता आधारित आहे.     
                             
                  १७७५ मधील ---पहिल्या युद्धानंतर फ्रान्सच्या मदतीने ''  ब्रिटीशांच्या   '' जोखडातून मुक्त झाले .४ जुलै १७७६ हा अमेरिकेचा जन्म दिवस .जेमतेम.... २३५ वर्षाच्या कालावधीत......   ख्रिस्तोफर कोलंबसाची ही  अमेरीका .... १९९१ मध्ये माहिती तंत्र ज्ञानाच्या मदतीने उच्च पदाला पोहोचली .यशस्वी लोकप्रिय  योद्धा -- जॉर्ज वाशिंगटन --विद्वान वकील  अब्राहम लिंकन --अंतराळ युगाचे जनक जॉन एफ केनेडी ---रेगन ---क्लिंटन --बुश ---ते आताचे पहीले--- आफ्रिकन अमेरिकन प्रेसिडेंट-- हार्वर्ड विद्यापीठ  पदवीधर .... बराक ओबामा यांनी आपापल्या कर्तुत्वाने व देशप्रेमाने  अमेरिकेचा आज   तागायतचा यशस्वी  इतिहास जगापुढे ... नावारूपास  आणला  आहे .
                  मार्टिन ल्युथर किंग ( ज्युनिअर )हाही अमेरिकेच्या इतिहासातील १९६४ चा.... नोबेल पीस- प्राईज विजेता-- ब्ल्याक अमेरिकन. गुलामगिरी संपविणारे..... अब्राहम लिंकन व तरुण राजबिंडे.... जॉन एफ केनेडी या गुणी- जनांची  माथे -फिरूंनी  केलेली हत्त्या हे -ऐतिहासिक '' कलंक '' येथील गोरेपणावर चांगलेच उठून --( खुपून ) दिसतात .
                  विस्तृत भू भाग -विलोभनीय सृष्टी सौंदर्य -अत्याधुनिक यंत्र सामग्रीचा सुयोग्य वापर आणि उच्च शिक्षणाचे.... खुले महाद्वार यामुळे अनेक परदेशस्थांना  येथे येण्याचा मोह.. न झाल्यासच आश्चर्य . वक्तशीरपणा -वाहतुकीची--- करडी  शिस्त -सार्वजनिक स्वच्छता - दैदिप्यमान -- इतिहासाची भव्य म्युझियम्सद्वारा केलेली जपणूक आणि व्यक्तीच्या योग्यते नुसार जगातील... उंच असे स्मारक  बांधून  त्याच्या त्यागाला   आणि विद्वत्तेला योग्य तो दिला जाणारा मान येथे पहावयास मिळतो . संशोधनाच्या असंख्य संधी येथे उपलब्ध आहेत .
                  कॉम्पुटरच्या अलौकिक शोधामुळे येथे ..''.वर्क  फ्रॉम होम '' -- फोर्मल ड्रेस --  ही संकल्पनाही उदारपणे स्वीकारली  गेली आहे .प्रत्येकाच्या गुणवत्तेला येथे--- वाव आहे व... उत्कृष्ट  कामाचे भरघोस.....दामही आहे .येथील आय बी एम कंपनीने एवढ्यात शंभरी गाठली आहे . जग भराच्या जिव्हाळ्याचे तसेच विवंचनेचे  --- पेट्रोलचे भावाची चढ उतार येथे...... तर सोन्याचे भाव लंडन मध्येच  ठरतात .

                  माणसाला पक्ष्याप्रमाणे...... विहंगम दृश्याचा अनुभव घेण्याची.... कायम स्वरूपी व्यवस्था करून ठेवलेल्या  राईट बंधूच्या प्रेरणेने आतापर्यंतच्या  - भल्या मोठ्या बोईंग विमानापासून - ते -- खिश्यातील मोबाईल पर्यंतच्या  असंख्य दैनंदिन लागणाऱ्या  सुख  सोयींच्या शोधांच्या या  जननीने ---राईट बंधू... ते बिल गेट्स या सारखे  असंख्य सुपुत्र दिले आहेत . जगभरातील...... मानवी विद्वत्तेच्या  .... हिऱ्यांना उत्कृष्ट पैलू पाडण्याचे काम येथील--- समृद्ध अश्या विद्यापीठातून चालते .आणि त्यातूनच जगप्रसिद्ध...असे .... नोबेल *- ऑस्कर *- विम्बल्डन *-  कान्स* --असे--- अवार्ड  विजेते--या  मावळतीकडेही.... उदयास येत आहेत.
                  हे पाहूनच आता पूर्वेकडील.. चीन -जपान ....मधील विद्यार्थीसुद्द्धा आपल्या पारंपारिक भाषेच्या...पाश्यातून मोकळे होऊन इंग्रजी भाषा आत्मसात करीत आहेत व या भाषेच्या ...सुताचे जोरावरच---- पश्चिमेकडील ..स्वर्गाचे दार असंख्य.. भारतीयांप्रमाणे ठोठावू  लागले आहेत .मातृभाषेतील शिक्षणाच्या  नाण्याची दुसरी बाजू----- इंग्रजीची असली की ते खणखणणारच यात आता शंका राहिलेली नाही .
                  याच मोहाने अमेरिकेच्या वाटेवर असंख्य... इच्छुकांची भाऊगर्दी- देशातील पासपोर्ट ऑफिसमध्ये पहावयास मिळते .तेथील.. सत्व परीक्षेत --तावून सुलाखून जो उ-तरतो ... तो --- जी आर इ  // टोफेल ... चे अडथळे पार केलेला जिज्ञासू --- विद्यार्थी येथे आल्यावर  आपल्या ज्ञानाचे.... सोने करतो अन ....डॉलर कमाईस-- पात्र ठरतो .
                  येथे सध्यातरी दक्षिण भारतीय..विद्यार्थी , गुजराथी...व्यापारी मंडळी व पंजाबी .. हॉटेलओनर्स प्रामुख्याने   अमेरिकेत  विखुरलेले पहावयास मिळतात .त्यामुळेच एव्हड्यात अमेरिकेने आपली कौन्सिलेटही .... हैद्राबाद येथेही उघडली आहे .

                  असे  हे आधुनिक.. .. 'श्रावणबाळ' आपापल्या '' दीर्घदृष्टीच्या '' आईवडीलांना  '' ऐटीत '' या मोहमयी माया नगरी ---अमेरिकेची-वारी घडवून आणल्याचे--भरघोस  पुण्य गाठीशी बांधण्याचे तयारीस लागतात, ते येथील आपल्या  भटकंतीतल्या -- प्रेक्षणीय स्थळी दृष्टोत्पत्तीस पडते .पालकांच्या चेहऱ्यावरील  मनस्वी समाधानाच्या.. प्रतिमांचे प्रतिबिंबही  क्यामेर्याच्या क्लिकने  कायमचे  बंदिस्त होते ते पुनःपुन्हा--- मायदेशी.. '' उजळणी '' करण्यासाठी व सुहृदांनाही....आभासी (virtual ) अमेरीकावारी घडविण्याचे...प्रेझेंटेबल ... प्रेझेंट देण्यासाठी .

                  अश्या अचंबित करणाऱ्या ----अमेरिकेस ..४ जुलै च्या.. वर्धापन दिनानिमित्त  हार्दिक शुभेच्छा ...!!!!!!!

No comments:

Post a Comment