डॉ .अरविंद वैद्य
दिनांक - २५ एप्रिल २०११
पुणे
// अमेरिकेच्या ( '' इस्ट '' ) वाटेवर //
********************************
आमच्या आयुष्यतील विमान प्रवासाची '' ह्यात्रिक '' यंदाच्या अमेरिकेच्या विमान प्रवासाने होत आहे .
याचा वेगळाच आनंद आहे .
वेळेच्या बाबतीत भारताच्या '' मागे '' राहूनही हा अमेरिका देश एव्हडा आघाडीवर कसा आहे बर ?...... याचा'' मागोवा '' घेण्याची उत्तम संधी '' मिलिंद -प्राजक्ता '' यांनी मराठी नव वर्षाच्या प्रारंभी उपलब्ध करून दिली आहे .यासंधीचे '' सोने '' कसे करता येईल हेच आता पाहायचे आहे. नाहीतरी या सोन्यासारख्या संधीची '' चांदी '' झाली तरी आनंदी आनंदच आहे .
प्राथमिक पण कट - कटीची '' पूर्व '' तयारी व्यवस्थित पूर्ण झाल्याने, '' पश्चिमेकडील '' गोष्टींचा उलगडा यथावकाश सुलभ पणे होईल अशी खात्री आहे.
'' लुफ्तांझा '' या कंपनीच्या LH - 765 * या फ्लाइटने दिनांक .... २८ एप्रिल २०११ रोजी भल्या पहाटे मुंबई --- सहारा वरून भल्या पहाटे १.१० वाजता आमचे विमान अमेरिकेकडे प्रस्थान करेल .व '' २८ एप्रिल २०११ रोजी दुपारी ३ चे '' सुमारास अमेरिकेच्या भूमीवर .....वाशिंगटन येथे आमचे ------ पहिले वहीले पाऊल पडेल .
सर्वच पहिल्या गोष्टींची उत्छुकता माणसाला असते तशीच आमची अवस्था झाली आहे. .अमेरिका व अमेरिकेतील आपले सगे सोयरे यांच्या भेटीस आतुर..........!!!!!!!
टी.वी. वरील '' मृण्मयीच्या '' शब्दात सांगायचे तर, आता तर ...... ''लई भारी वाटतंय '' ........ !!!!!!!!! ....आणि काय सांगू...?..
बाकी नंतर सर्व तेथूनच --- '' थंड '' डोक्याने सुचेल तसे कळवूच.
अनुष्का - अश्विनी - मंदार यांच्या बरोबरच्या'' इंग्लंड ''अबिंग्डन मधील मधुर ''आठवणी '' धूसर होत नाहीत - तोच
मिलिंद -प्राजक्ता बरोबर राहण्याचा व अमेरिकेच्या प्रवासाचा ' दुग्ध - शर्करा ' असा योग ४-५ महिन्यातच लवकर जुळून आला आहे.
आणि नव्या पर्यटन '' अध्यायाचा '' शुभारंभ नव्या मराठी वर्षाच्या प्रारंभीच आणि तोही '' अक्षय तृतीयेच्या '' आगामी शुभ मुहूर्तावर
होत आहे यातच '' अक्षय '' आनंद भरून राहिला आहे .
डॉ .अरविंद व सौ जयश्री
वैद्य
'' अधांतरी ''
*********************
No comments:
Post a Comment