आमचे पाहिले औटींग
Harpers Ferry---National Historical Park
West Viriginia--,Maryland,---Virginia ********************************************************************
येथील शिरस्त्या प्रमाणे विक एंड ला शनिवारी सकाळीच नाश्ता करून व दुपारच्या पोट पुजेची व्यवस्था बरोबर घेऊन निघालो .West Viriginia--,Maryland,---
दिमतीला ----Mitsubishi-- Verginiya-XMS-2100 कार होतीच .प्राजक्ताने ड्रायविंग सीटची तर बाजूस ''गाईड ''म्हणून मिलिंद होताच .मागे आम्ही
'' जेष्ठ नागरिक '' व मिलिंदचा एक मित्र ......स्वप्नील कार्येकर एक बडबडे व्यक्तिमत्व .
सकाळच्या प्रसन्न वातावरणात--- कारने आपली मार्गक्रमणा लांबवर पसरलेल्या रस्त्यावरून सुरु केली... .आणि यथोचित असे -----पल पल पल
-- हरपल हरपल--- कैसे कटेगा --पल-- हरपल-हरपल ---या सुमधूर गाण्या सोबत रस्ता मागे पडू लागला.दुतर्फा हिरव्या गार गवताच्या गालीच्या मधून पसरलेल्या रस्त्यावरून पळणारी कार---- Harpers Ferry---National Historical Park -------जवळ केंव्हा आली हे कळले देखील नाही .
आपली कार पार्क करून तेथील मोठ्या गाडीने आत गर्द झाडीतून दूरवर सर्वाना घेऊन जाण्याची उत्तम व्यवस्था होती .
डोंगर दऱ्यातून खळ खळ वाहणाऱ्या Shenandoah आणि potomac या नद्यांच्या संगमाच्या व सभोवतालच्या दरीमधील विलोभनीय अश्या थंड वातावणात आपण येऊन पोहोचतो.येथून पाऊल वाटेने विस्तीर्ण पसरलेल्या सभोवतालच्या पार्क मध्ये भटकंती सुरु केली .
हे पार्क म्हणजे --जॉर्ज वाशिंग्टन --अब्राहम लिंकन यांनी प्रस्थापित केलेली त्यावेळच्या ''अम्युनिशन फ्याक्टरीचा परिसर ''.येथेच युद्धास लागणारा दारुगोळा व बंदुका तयार होत असत.त्याची माहिती म्युझियम मधून आजही जपून ठेवली आहे .आजू बाजूस टुमदार वसाहत ,.डोंगर माथ्यावर चर्च, उंचावरून दिसणारा नयन मनोहारी असा परिसर पाहून आनंद दुणावतो
अश्या वातावरणातच झाडाखालील असलेल्या बाकावर बसून वनभोजनाचा आस्वाद घेतला.अन पुनश्य नव्या उत्चाहात मेरील्यांड ----वेस्ट वर्जिनिया-----वर्जिनिया या तीन विभागांचा दुवा असलेल्या नदीकाठी भटकंती करून तेथील आईस्क्रीमची मजा चाखत.... तेथील आठवणी मनात साठवून सायंकाळी आकाशात उडणाऱ्या पाखरान समवेत आम्हीही घराकडे परतलो .