दोन महिन्यांच्या प्रदीर्घ पूर्व तयारी नंतर २७ एप्रिल २०११ दुपारी ४.३० वाजता "Sandy's" च्या तवेराने सहार विमानतळाकडे प्रस्थान केले .सामान वगैरे चेकिंग थोड्याच वेळात झाले ,सर्व सामान व्यवस्थित नियमानुसार झाल्याने सुटकेच निश्वास सोडला तब्बल ६ ब्यागा होत्या.LH-765 -विमानाने पहाटे १.१० ला उड्डाण केले .भौगोलिक असा अरबी समुद्र ओलांडून आम्ही सकाळी ६ वाजता ''म्युनिच ''जर्मनी येथे ५ तासांच्या ब्रेक साठी उतरलो .
फ्रेश होऊन सभोवतालच्या भव्य वेटिंग एरियातिल भव्य दुकानात आपल्या परिचयाची"जर्मनची भांडी "...... कोठे दिसतात का ?हे पाहिले पण त्याचा मागमूसही दिसला नाही ------पिकते तिथे विकत नसावे --- बहुतेक ?
म्युनिच हे नवीनच विमानतळ आहे लहानमोठ्या विमानांची चहल पहल दिसत होती. डाव्या बाजूस विस्तीर्ण मैदानावर रनवे व हिरवे गवताचे पट्टे असे अनोखे नेत्र सुख देणारे मिश्रण पहावयास मिळाले .त्यावर अलगद पणे उतरणारी विमाने ''मोठ्या'' फुलपाखराप्रमाणे भासत होती .पुढचे विमान १ तास उशिरा सुटणार असल्याचे समजले .त्यामुळे पुन्हा एकदा फ्रेश होऊन तेथेच पेपर्स वाचत वेळ घालविला
१२. ३० वाजता LH- 414 हे विमान वाशिंग्टन डी सी कडे झेपावले .अटलांटिक हा महाकाय महासागर उल्लंघून --'अमेरिकेतील वाशिंग्टन डी सी च्या ''डलेस '' विमानतळावर १० तासांच्या प्रवासानंतर दुपारी ४ वाजता पोहोचलो.'स्वप्नवत '--वाटणाऱ्या व आतापर्यंत फक्त भौगोलिक परिचयाच्या अश्या अमेरिकेच्या भूमीवर आमचे पहिले पाऊल ठेवले व चंद्रावर उतरलेल्या चांद्रवीरांप्रमाणे आनंद अनुभवला .
मिलिंद - प्राजक्ता स्वागतासाठी हजार होतेच .विमान तळाबाहेर पडताच विशाल अश्या पार्किंग लॉट मधून कार बाहेर काढली व अमेरिकेच्या उबदार कुशीत ऐतिहासिक अश्या HERNDON ,VA 20171 येथे विसावलो देखील .
डॉ .अरविंद व सौ जयश्री
वैद्य
'' मध्यंतरी ''
No comments:
Post a Comment