Monday, May 23, 2011

वाचाल तर वाचाल ................

   क्रियेवीण वाचाळता .......व्यर्थ आहे .....!!!!!
                             
खरोखरच कांही छोट्याश्या शब्दात भलामोठा अर्थ दडलेला असतो.  आज काल वेळ नाही हो वाचायला  ..असेच ऐकावे  लागते .
                                 आजच्या धावपळीच्या युगात मोबाईल वरील.... एस एम एस हीच खरी मूक --  बोली भाषा तयार झालेली दिसून येते आहे .
                                 मागील पिढी घडली ती... सुलेखन पद्धतीच्या लेखनाने . त्यामुळे अक्षर कसे बाळबोध वळणदार असे .त्यामध्ये एक जिवंत पणा --आपले पणा असे .पत्रलेखनातून....... तर ती विशेष खुलत असे. वाचतानाही ती .........मनाला भिडत असे .
                                  आणि हल्लीची तरुणाई रमली आहे ती ---ई-लेखनाच्या, ई-मेलच्या,  इनस्टंट कॉफीच्या ......वाफाळलेल्या क्षणभंगुर जगात .सर्व काही झटपट .....चटपट   आणि  पटापट च्या पायऱ्या ओलांडण्यात. त्यामुळे त्या लेखनात नि वाचनात एकसुरीपणा जाणवतो .सर्वच पत्रातील मजकूर एकाच  छापाचा. पण   ब्रेड --बर्गर च्या बाजारात त्याचाच बडेजाव चालतो आहे .याची प्रचीती येते .कालाय तस्मै:नमः !  दुसरे काय ?
                                  चुटकी सरशी क्लिक च्या चावीने उघडणारे ''गुगलचे विश्व ''जोडीला असल्यावर----- कशाचीच  चिंता नाही . त्यामुळे या नव्या विश्वात रमून घ्यावेच लागते .अन्यथा  प्रत्यक्ष्य'' लिहिता वाचता '' येत असूनही याची जोड नसेल तर ...संगणक निरक्षरचा... शिक्का ठरलेलाच.
याचे सहाय्याने आपण क्षणात जगाच्या या कोपऱ्यातून त्या कोनापर्यंत लीलया संचार करू शकतो .हे ही नसे थोडके .
                                   आणि या वाचून....... फार काळ दूर राहणे....... चालणारही नाही .चला तर आपणही या नव्या जगाच्या वास्तवात रममाण होऊ या .आनंद लुटूयात व नवा मंत्र जपूयात शिकाल तर वाचाल .......!!
 
डॉ.अरविंद व सौ .जयश्री  वैद्य
                              
           अमेरीका
                                     
 

No comments:

Post a Comment