वाशिंग्टन डी सी --- Dulles विमानतळावरून घरी जातानाच अमेरिकेच्या रस्त्यावर वावरताना पहिला फरक जाणवला तो म्हणजे डाव्या बाजूस असणारे कारचे '' ड्रायविंग सीट '' डाव्या बाजूने जाणारी व उजव्या बाजूने येणारी वाहतूक .प्रशस्त चकाचक रस्ते -- सिग्नलच्या दिव्यांचे लांबलचक आडवे खांब व रस्त्याचे कडेला असलेले दिव्यांचे उंच असे खांब.बाकी सर्व आकाश मोकळे मोकळे भव्य दिसते .आपल्या सारख्या लाईटच्या तारांचे जाळे ,भले मोठे होर्डींग्स ,जाहिरातींची भाऊ गर्दी येथे अजिबात नसते .
त्यामुळे भव्यता जाणवते . आणि --------------फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश------- या गाण्याची प्रकर्षाने आठवण येते.
मिलिंद -प्राजक्ता रहात असलेली -Herendon-Little current DR (DRIVE) HE छोठे खानी दुमजली अपार्टमेंटची वसाहत ,सुबक आखीव रेखीव पार्किंगची व्यवस्था ,सभोवती हिरव्या गार झाडांची फौज .प्रत्येक इमारतीवर त्यांचे नंबर्स ,दारावर फ्ल्यातचे नंबर्स आमच्या अपार्टमेंटचा नंबर --2444 व फ्ल्याट क्रमांक --- 4442 असा वैशिष्ठ्य पूर्ण आहे .सर्व फ्ल्याट एकसारखे आतून बाहेरून पांढऱ्या शुभ्र रंगाचे,.... लाकडी जीने,.....एक वेगळाच रुबाब दिसतो.
या घराची व्यवस्था --- आत शिरताच डाव्या बाजूस किचनची व्यवस्था डाव्या कोपऱ्यात. दिवाणखाना व नंतर २ बेड रूम्स .दिवाणखान्याला लागून छोटी ग्यालरी.कॉलनीच्या मध्यभागी छोटेसे पटांगण--लहान मुलांना खेळण्यास झोका ,घसरगुंडी ,स्विमिंग पूल प्रशस्त आवार.चालण्यासाठी सिमेंट कोन्क्रीतचा हिरवलीभोवतीचा छानसा वळणा वळणाचा रस्ता .
आपल्याकडे सध्या टाउन शिप कॉलनीत असा प्रकार पहावयास मिळतो. इंग्लंड च्या तुलनेत येथे रस्ते -दुकाने --पार्किंग --कार्स सारे काही प्रशस्त असे दिसून येते .काचेची तावदाने असलेल्या भव्य कार्यालयामध्ये सर्रास रात्रभर दिवे चालूच असल्याचे आढळतात .सगळीकडे नैसर्गिक हिरवळ मात्र आवर्जून पहावयास मिळते त्यामुळे डोळ्यांना आपोआपच थंडावा मिळतो .......
क्रमशः
No comments:
Post a Comment