// फळांचा...... चापून घेतलेला समाचार ....!!! // -- 3
.......................................................................
// कर्मण्ये - वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ....!!-- असे म्हणतात .//
.....................................................................................................
* * * केळ .....3
...............................
'' केळ '' --खायला असा वेळच कितीसा लागतो म्हणा त्यामुळे अगदी आज कालची मऊशार -- चोकलेटची वडी खावी त्या वेळातच त्याचा फडशा पाडता येतो . त्यसाठी....'' वेळ'' नाही असे म्हणणारी व्यक्ती मला अजून तरी भेटलेली नाही.इतके सहज सोपे -विना बियाचे असे हे सर्व सामांन्यांच्या आवाक्यातले-- एकमेव फळ असावे .मधुर अशी एकच चव थोडी कमी अधिक प्रमाणात त्याची असते .रूपही गोजिरवाणे ,आटोपशीर हलके फुलके .पण वेळेला २-४ केली खाली तरी भूक भागून जाईल एव्हडी ताकद त्यात नक्की असते .त्याचा हंगाम म्हणाल तर----- बारमाही पिकासारखाच असतो .बरे भावही--- जास्तीचा खात नाही कधी .इतर फळांचे मानाने सर्व सामान्यांना परवडणारे व चांगलेच असल्याची खात्रीही बाह्य रुपा वरूनच मिळते .ह्याला रंग रूपही फार नसते .सुरवातीला कच्च्या स्वरूपातील हिरवे व नंतर हळू हळू पिवळे होत जाणारे .व गोडी वाढल्याची सूचना तो अंगावर छित्री डॉट ची... मेंदी काढून सांगून मोकळा होतो .ह्या मनमोकळ्या स्वभावाने सर्वांचाच ते फळ आवडते असते .झाडावर सरडा आपले रंग-- झटपट बदलतो पण याची याबाबत मंदगती चाल असते .
पूजा आदी धार्मिक विधी उपासतापास यावेळेला '' केळ '' म्हणजे एक हुकमी एक्काच असतो .त्याची उपस्थितीही प्रार्थनीय असते. अहो आपण नेहमी झटपट खाणारा शिरा वा उप्पीट-- डीश भर खाल्ला तरी पोट भरत नाही.पण-- केळाच्या-- परीस स्पर्शाने त्याच एरवीच्या --गोड शिऱ्याचा - सत्य-नारायणाचा -''-प्रसाद -''-होतो .त्याच्या लहानश्या- द्रोणातील अस्तित्वाने- अन शुद्ध तुपाच्या चवीने-- मन आत्मिक समाधानाने भरून जाते व त्यातही अनेकजणांना आपण सामावून घेतो .केव्हडे हे -असामान्य ..संग महात्म्य. दुधाच्या मैत्रीने त्यांचे ''शिक्रणात ''रुपांतर होते. तर- कस्टर्डच्या सानिध्याने ते -''-फ्रुटस्यालड ''--अश्या झोकदार- नामकरणाने --' टाय 'घातलेला जंटल- मन होऊन जाते अन--- पंच तारांकित हॉटेलमधील मेनुतील-डेझर्ट -सेक्शन- मध्ये स्थलांतरित होते व वेगळीच किमती- उंची ही गाठते .

.दाक्षीणात्य लोकांमध्ये केळाचे----- 'वेफर्स 'हा खारा-- पदार्थ लोकप्रिय आहे .त्यामध्ये मात्र तो आपल्यातील-'' कडकपणा''
प्रथमच लोकांपुढे आणतो कारण त्यालाही बरेच दिवस-- टिकून राहायचे असल्याने --'' कडक'' तेलाच्या सहाय्याने आपोआपच'' वाण नाही पण गुण लागतो '' तसे होते. याचेही काही-- खुजे भाऊबंध आहेत त्यांना ''सोनकेळी'' संबोधले जाते .ती तर नेहमीच्या केळ्यानपेक्षा अधिक गोड असतात म्हणूनच लहानमुलांना माझ्या ''सोन्या '' असे म्हणत असावे बहुतेक .एके काळी--पेशव्यांचेवास्तव्य असलेले --छोटे - वसई हे गावही ..केळ्यांसाठी प्रसिद्ध होते आता तेथेही सिमेंटची जंगले वाढल्याने वसई करांना सुद्धा आता जळगाव व इतर ठिकाणच्या केळांची--वेशीवर आतुरतेने वाट पहावी लागत आहे अशी अवस्था आहे .
लहान लहान केळीचे--- खुंट सत्यनारायणाचे धार्मिक - पूजेला चौरंग सजविण्यास लागतात.तसेच लग्न समारंभाचे वेळेस मोठे खुंट - प्रवेश द्वाराशी उभारतात.त्यामुळेही वैवाहिक आयुष्यास-- बळकटी येत असावी .केळ्याचा भरभक्कम बुंधा -- झाड तसेच केळ्यांच्या घडांचा भार आणि लांब रुंद डोलणाऱ्या पानांचा-- तोल भक्कमपणे सांभाळत असल्याने त्यास ''खुंट '' म्हणत असावे .आपणही व्यवहारात एखादी गोष्ट पक्की करून घेण्यास ''अगदी खुंटा हलवून बघितला ''--- असे म्हणतोच ना. केळीची- हत्तीच्या कानाप्रमाणे झुलणारी पाने आतील फळांना उन- पावसा पासून जपतात .ह्या पानांचा उपयोग -शाही जेवणावळीतही करतात .या हिरव्याकंच पानावर मांडलेले सात्विक गोड-धोड -भोजन- सुवार्णालंकार -ल्यालेल्या नववधू प्रमाणे नेत्र सुख तर देतेच पण जिव्हा सुखाने दोन घास जास्तीचे जावून उदरभरण ही ..चापून होते .
झाडावरील केळ्यांच्या समूहास'' घड '' म्हणतात तर गाडीवरील लहान समूहास'' फणी '' म्हणतात .अशी फणी शुभ कार्यात शोभून दिसते .उपवर मुलींच्या ओटीतही अशी फणी घालण्याचा प्रघात आहे .......काही म्हणा या केळ्यांच्या देखणेपणातच एक वजनदारपणाही जाणवतो तो काही वेगळाच.रुबाबात आरामखुर्ची टाकून ......समुद्रकिनारी ओळीने हवा खात बसावे तसा .
पण एकदा का ती------मऊशार- खुर्ची सोडली तर त्या सालीची अवस्था मात्र--- '' सैर भैर'' होते अगदी खुर्ची गमावलेल्या--- राजकीय पुढाऱ्या प्रमाणे , ( केळाची --साल-- काहीशी- हलकी- फुलकी व केळ खावून झाल्यावर मात्र लगेच लेची पेची अन नकोशी होते ).पण त्याही अवस्थेत आपल्या योग्य त्या मानाच्या -जागेच्याच -अपेक्षित असते ---'' सालीची '' - योग्य ती ' बडदास्त 'ठेवली नाही व तिला योग्य ते '' मानाचे '' सुरक्षित स्थान-दिले गेले नाही व ........ पायदळी तुडविण्याचा प्रयत्न केलातर , -------ती सुद्धा---- भल्या भल्यांना--'' आस्मान ''दाखविल्याशिवाय रहात नाही हे .....मात्र अवश्य ध्यानी असू द्यात म्हणजे झाले .
..... तू-- जपून टाक पाऊल जरा ....जीवनातल्या मुशाफिरा /-----!!
---या गाण्याची अन माझीही नीट --'' आठवणही ''- ठेवा एव्हडेच सांगते बिचारी ....''.ती केळ्याची साल .''
....................................................................................................................................................................
डॉ. अरविंद वैद्य
५ ,ऑगस्ट २०११
'' शुक्रवार ''
No comments:
Post a Comment