// फळांचा...... चापून घेतलेला समाचार ....!!! // -- ५
.......................................................................
// कर्मण्ये - वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ....!!-- असे म्हणतात .//
.......................................................................................................
पान-सुपारी ----- ५
.............................................
श्रावणातील निळ्या-- मेघातून श्रावण धारा बरसल्याने' वसुंधरा '--नख शिखांत मोहरून जाते . एखाद्या नव वधू प्रमाणे हिरवागार शालू ल्याल्याने व त्यावर पडलेल्या कोवळ्या उन्हाने तिच्या रुपाला वेगळीच सुवर्ण झळाळी येते .ह्या सर्व नयन सुख देणाऱ्या निसर्गाचे उतराई होऊन आनंद साजरा करण्यास स्नेहीजन एकत्र येतात. ---श्रावण -सोमवारी आमचे कडे ''सत्यनारायण व पान सुपारीचा '' कार्यक्रम आहे अशी निमंत्रणे घरोघरी धाडली जातात .आणि अश्या धार्मिक पवित्र कार्याचे निमित्ताने आपला --सुपारी --या फळाशी सहज संबंध जुळून येतो.पान -सुपारी म्हणजे जणू एकाच नाण्याच्या दोन बाजुच जणू एव्हडा हा शब्द प्रयोग परिचयाचा आहे .त्यामुळेच तर धार्मिक विधीत दोघांना एकत्रितच मानाचे स्थान आहे .सुपारीशिवाय पान हलत नाही .
अश्या कार्यक्रमा निमित्तानेच एकमेकातील '' स्नेह-संबंध '' धृढ होतात. म्हणूनच ''सुपारी -फुटली '' हे शब्द उच्चारताच दोन घराण्यातील '' लग्न - संबंध जुळले '' असाच होतो.(......केव्हडा हा विरोधा भास...! ) पुढे ते मात्र अखंड सुपारी प्रमाणेच ते राहावेत हाच त्यातून खरा--
गर्भित अर्थ अभिप्रेत आहे .कोकणातील नारळ -आंबा -कोकम --फणस -या फळ भावंडातील हे खरे तर '' शेंडेफळ ''च म्हणावे लागेल .मूर्ती लहान पण कीर्ती महान ह्या शब्दाच्या प्रचीतीला अजून काय हवे ...?
बालसुलभ कोवळ्या वयात हिरवी मऊ शार असणारी सुपारी चाकुनेही सहजपणे कापता येते .पण उन्हातानात रापून वयात येताच मात्र ती आपला रंग -रूप बदलते तसा स्वभावही कणखर बनत जातो तो एव्हडा की धारदार चाकुलाही ती आता मुळीच घाबरत नाही.ह्या तिच्या हट्टी स्वभावाला वळविण्यासाठी तिला आकाराने छोट्याच अश्या ''अडकित्त्यात '' पकडावे लागते . शक्ती पेक्षा युक्ती उपयोगाला येते . काट्यानेच काटा काढावा लागतो हे सूत्र उपयोगी पडते.
सुपारी जेवणानंतर मुख शुद्धी करता खातात .पान-सुपारी -चुना -लवंग -बडीशेप - वेलदोडा-गुंजपाला हे सप्त सूर एकत्र आले तर अशी काही----- सरगम---- निघते की गायिकेचा आवाजही खुलतोच पण जीभ - ओठ, लिपस्टिक शिवाय लाल होऊन रूपही खुलते ते वेगळेच.चहा- कॉफी इतकीच सुपारीही थोडी उत्साह वर्धकच आहे .कष्टकरी माणसे त्यामुळेच.... ''जरा वाईच सुपारी काढा की हो ---पाव्हन ....! असे बोलून गप्पातील रंगत नव्या दमाने वाढवीतच बसतात.या सुपारीचीच एक लालसर चपट्या आकाराची एक बहिणही--चिकनी-- सुपारी म्हणून मिळते .नावा प्रमाणेच तिची चव काही वेगळीच .सुपारी काही लोकाना लागते त्यसाठी ती खमंग भाजूनही खाल्ली जाते .अगदीच सहन होत नसेल तर बडीशेप - लवंग -वेलची -जायपत्री -मिंट -जेष्ठ मध घालूनही ''सुपारी विना मसाला सुपारीला '' चांगलीच पसंती असते.थोड्या प्रमाणात खाल्ल्यास दातांचे आरोग्य सुधारते व-कृमी नाशक ही आहे .पण ''अती सर्वत्र वर्जयेत ''अन्यथा ती घसा-पोटातील आतडी यांच्या कर्क रोगासही कारणीभूत ठरू शकते.तेंव्हा जरा जपूनच रहा या --सुपारी पासून .सुपारीच्या खानडाचेही व्यसन-- नसणारेही काही--- महाभाग असतात या जगात .
कळीदार कपुरी पान कोवळ छान केशरी चुना /
रंगला काथ केवढा ,वर्खाचा विडा घ्या हो मन रमणा..//
बारीक 'सुपारी निम चिकणी' घालून /
जायपत्री वेलची लवंग वरी दाबून /
बांधले तसे या कुडीत पंच प्राण /
घ्या,रंगत करी मर्दुनी ,चतुर्दश गुणी ,सख्या सजणा...//
( राजा बढे --श्रीनिवास खळे --सुलोचना चव्हाण )
या -कर्ण मधुर लावणीतून -(गाण्यातून ) ....आपणास या त्रयींनी ..--''.पान-- सुपारीच्या '' स्नेह संबंधास एका वेगळ्याच
उंचीवर नेऊन ठेवल्याचे दिसते आहे .
तर आमच्याकडील -- ' सत्यनारायण -पान सुपारीचे ' तसेच त्यानंतरचे---- चहा पानास आग्रहाचे निमंत्रण आहे ........
चला तर मग ..........
------------------------------------------------------------------------- ( समाप्त ..)
.........................................
डॉ .अरविंद वैद्य
८,ऑगस्ट २०११
सोमवार
अमेरीका
..........................................

No comments:
Post a Comment