// फळांचा...... चापून घेतलेला समाचार ....!!! // --१
.......................................................................
// कर्मण्ये - वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ....!!-- असे म्हणतात .//
.......................................................................................................
नारळ --१
-----------------
कोणत्याही कार्यक्रमाचा शुभारंभ ''नारळ '' वाढवूनच केला जातो.त्यामुळेच त्याला ..श्रीफळ असेही म्हणतात.त्याचे मातेस तर-- कल्पवृक्ष असे संबोधले जाते .नारळाशिवाय खरे तर पान हलत नाही .कारण विड्याच्या हलक्या फुलक्या पानावर तर तो कायम विराजमान असतो.जणू त्याचे वाहनच .बिचारे पान त्याच्या सहवासाने सुरवातीला हरखून जाते खरे पण नंतर त्याच्या अवजड भाराने कोमेजतेही .
गृहिणीच्या तर हा कायम हाताशी असतो एखाद्या आज्ञाधारक मुलासारखा .बर्फी करा - चटणी करा वा दीपक पाचक अशी आमसूल घालून सोलकढी करा ---------अन जेवणावर --हवा- तसा बिनधास्त ताव मारा .त्याच्या नावाची खास --नारळी- पोर्णिमा सुद्धा श्रावणात असते .मग काय तो त्यादिवशी गोकुलातच नांदत असतो. स्त्रियांच्या ओटीत तर याला कायमच अढळ असे मानाचे स्थान असते .
लग्नात ''व्याही भेटीत '' पट्ट्या दोन्ही बाजूच्या सर्व मानाच्या पानांचा समाचार.. एकटाच की हो घेतो .त्यावरूनच त्याच्या सुप्त शक्तीची कल्पना येते . -----त्यामुळेच कोणाला नकळत निरोप द्यावयाचा असेल तरी त्याचे हातावरी ''महाशय -'' शालीचे उबेत तोंड लपवून रुबाबात बसून ,यजमानांचे डोळ्यात मात्र पाणी आणतात हे नक्की .
आणि हो पावसाळ्यातील खवळलेल्या समुद्राचे पोटात बेमालूम शिरून त्यालाही वठणीवर आणून दर्यावर्दी बंधूंचा सागरी मार्ग खुला करतो.
लग्न समारंभ -- गणपती उत्सव --यावेळी तर याच्या भाऊ बंधांची तर ही -----गर्दी होते की काही विचारू नका .नवरात्रातपण हे महाशय रात्र रात्र जागवून काढत त्या महिशासूर -मर्दिनी देवीचे दर्शनही अगदी तीच्या गळ्यात पडूनच घेतात.केव्हडे हे..... धैर्य अन शौर्य .
...''कोवळ्या'' अश्या नाजूक - वयात तर हे आपला बाजारच रस्तोरस्ती मांडतात.देवळे अन हॉस्पिटल्स ही त्यांची ''इराणी हॉटेल '' प्रमाणेच मोक्याची हेरलेली ठिकाणे असतात .आजारी रुग्णांना तर हे ''संजीवनच ''ठरतात .अन उन्हाळ्यात तर पान्थस्थानच्या घश्याला , एव्हर -रेडी राहून थंडगार - मधुर अश्या हृद्य --नैसर्गिक -पाण्याची ''ओंजळ '' ( -प्लास्टिकच्या बाटली मधील - बिसलेरीच्या ..श्री -मुखात भडकावून देतच )------------- रिती करण्यातच धन्यता मानतात .
त्यामुळेच ----
कोकणची माणसे ---साधी भोळी ----
काळजात त्यांच्या भरली----- शहाळी-----------------
या शब्दानाही कर्णमधुर असे स्वर-माधुर्य प्राप्त होते ते वेगळेच.
----------------------------------------
डॉ.अरविंद वैद्य
अमेरिका
२ ऑगस्ट २०११
मंगळवार
No comments:
Post a Comment