// हवाहवासा वाटणारा......'' हवाई ''.....प्रवास // ( भाग १ )
............................................................................
हवा में उडता जाये........... मेरा लाल दुपट्टा मलमल का---------जी हा------ //
या गाण्यातील दुपट्टा ज्या सहजतेने हवेत उडत जातो तसाच आजचा विमान प्रवासही सहज सुलभ झालेला आहे .याचा अनुभव एवढ्यात मुंबई ---वाशिंग्टन या विमान प्रवासात आला .
आजच्या आय .टी. च्या युगात घरोघरची मुले आणि हो मुलीसुद्धा आपले ज्ञान अधिक समृद्ध करण्यासाठी ह्या मार्गाचा अवलंब करतात .अन सहज पणे उच्च शिक्षण घेऊन तेथेच इंगलंड -अमेरीका -जपान - जर्मनी -ऑस्ट्रेलिया येथे स्वछ्य -शांत -निसर्ग रम्य वातावरणात रमतात .तेथे मिळणाऱ्या सुखसोई मुळे तेथील प्रतिकूल हवामानातही हळू हळू सवयीचे होऊन जातात .
त्या नंतर सुरु होते पालकांची वारी कधी कन्व्होकेशन -अर्थात मुलांच्या पदवीदान समारंभाच्या निमित्ताने तर कधी लग्नाळलेल्या मुलीच्या किंवा सुनेच्या बाळंतपणासाठी. त्यामुळेच अनायासे मिळणाऱ्या ''आजी-आजोबा '' या परदेशात मुफ्त मध्ये मिळणाऱ्या नव्या पदवीमुळे .त्यामुळे मिळणारा आनंद काही वेगळाच असतो.
पण या ''' वर वर '' दिसणारा आनंद उप भोगण्यासाठी त्यानाही बरीच कळ----- काढावी लागलेली असते . हे मात्र --''वा वा ...!! निघालात वाटत--- इंग्लंड ----अमेरिकेला .मज्जा आहे बाबा तुमची !! असे म्हणणार्या नातेवाईक मंडळीच्या अथवा मित्र मंडळींच्या गावीही नसते . ह्या कळा सुद्धा भविष्यात सुखद आनंद देतात त्याचा प्रत्यय येतो तो या परदेश गमनाने.
त्यांचे माहिती साठीच हा प्रदीर्घ लेख --प्रपंच .................................
या सुखानंदाची मुहूर्त मेढ आपल्याला मुले झाल्यापासूनच सुरु होते त्यासाठी काही ---- स्वानुभवाचे '---- तंत्र आणि मंत्र ''
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
१) हल्लीच्या सुखी जीवनाच्या मंत्राप्रमाणे एक या दोन
२) मातृ भाषेतूनच शक्यतो प्राथमिक शिक्षण मुलांना द्यावे .
३) मुलांच्या सर्वांगीण गुणवाढी साठी आपला वेळ मुलांना द्या सह कुटुंब सहल काढा .
४) टी.वी.पाहण्याच्या--- व्यसनापासून आपण सर्वजण जरा दूरच राहा ५) मुलांमधील सुप्त गुणांचा शोध घ्या त्या साठी अधून मधून शाळेतील शिक्षकांना भेटा.
६) आपली मते मुलांवर लादू नका .
७) मुलांना एखादा छंद जोपासू द्या --
८) त्यांच्या मित्रांना घरी बोलवा आपणही त्यांचे घरी जा.
९) शाळे व्यतिरिक्त एखादी परकीय भाषा ८ वी -९ वी पासूनच शिकू द्या.
१०) घरातील वातावरण नेहमीच शांत व प्रसन्न ठेवा .
-----------------------------------------------------------
११ ) आलेला निकाल आनंदाने स्वीकारा-- पुढील वेळी सुधारण्यास वाव असतो याचे भान ठेवा.
१२ ) व्यावसाईक शिक्षणाची निवड करण्याची मुभा पूर्णपणे मुलांना घेऊ द्या.
१३) स्पर्धा परीक्षा देण्याचा प्रयत्न करा.
१४ ) मुलांना नेहमी प्रोत्चाहनच द्या .
१५ ) इतर मुलांशी आपल्या मुलाची तुलना करू नका.
१६) शिक्षक --- अनुभवी प्राध्यापकांचा सल्ला घ्या.
१७) आपण तसेच मुलांनाही वेळीच संगणक साक्षर करा .
१८) पोकेट मनी -मोबाईल- हॉटेलिंग च्या खर्चावर नियंत्रण ठेवा .
१९) मुलांकडे ---पती - पत्नी दोघांनी सारखेच लक्ष्य द्यावे .
२०) प्रयत्नांती परमेश्वर या मंत्रावर विश्वास ठेवा .
------------------------------------------------------------
२१) स्वतःसाठी--- दररोज १ तास वेळ काढा त्यात व्यायाम -मेडीटेशन -ध्यान धारणा करावी .
२२ ) देव धर्माचे '' अती अवडंबर ''-- आचरण नसावे
२३ ) महत्वाचे --मुलांची - लग्न ठरविताना मात्र मुलांच्या पसंतीलाच वाव द्या.
२४) त्यांचे संसारात अती ढवळा ढवळ '' आयांनी ''करू नये .
२५) येतील ते - प्रसंग -परिस्थिती -फायदा -नुकसान याचा फार विचार न करता मन मोकळ्या ''Accept'' करा व Forget and forgive चा मंत्र सतत ध्यानात असू द्या .
कारण एखादी मनाविरुद्ध गोष्ट घडून------- गेल्या नंतर ------- त्याचा फारसा त्रास करून घेऊन उपयोग नसतो .
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
// विमान प्रवासाची पात्रता //
अश्या प्रकारे अडथळ्याची शर्यत पार ..........केल्यानंतर मग कुठे मुलांच्या कर्तुत्वाला वाव मिळतो .
तो संगणक वा जी मिळेल त्या शाखेचा इंजिनियर होऊन नशिबाने चांगली साथ दिली तर डिग्री मिळण्यापूर्वीच क्याम्पस इंटरव्यू मधून सिलेक्ट होतो व खऱ्या अर्थाने अर्थार्जनास लागतो .व पालकांना हायसे वाटते . कंपनीत काम ....मिळणारे प्रोजेक्ट इंग्लंड -अमेरिकेतील असतील तर वेळी अवेळी काम करावे लागते .त्याची तयारी असावी लागते .व कामामध्ये चांगला प्रोग्रेस दिसला तर कंपनी डायरेक्ट त्यांच्या क्लायंट कडे म्हणजेच....... इंग्लंड -अमेरिकेस पाठविते .
त्या अगोदर आपला पासपोर्ट मात्र तयार असावा लागतो.आणि मग घरात सुरु होते ती वेगळीच --- लगीन घाई .
परदेशात जाण्याच्या अनोख्या तयारीस .........................................
दुसरा परदेशी जाण्याचा खुष्कीचा मार्ग म्हणजे बी .ई. झाल्या नंतर------ M.S. करण्यासाठीची G.R.E.परीक्षा देऊन --स्व खर्चाने ....तिकडील नामांकित विद्यापीठात प्रवेश घेणे .तेथे गेल्यावर कांही विद्यापीठात स्टायपेंड मिळते .अथवा तेथे सुटीचे दिवशी काम करून बऱ्यापैकी पोकेट मनी मिळू शकतो .
तेथे--- '' एकटे राहण्याची --स्वैंपाक करून खाण्याची --तेथील हवामानाशी जुळवून घेण्याची ----होम सिक न होण्याची मुलांची परीक्षा सुरु होते ती वेगळीच.आणि या सर्वातून जो '' सही सलामत सुटतो ----- '' तो खरा '' मुकद्दर का सिकंदर '' ठरतो .
हळू हळू येथील उत्तम -स्वच्छ -नीट नेटक्या वातावरणाची सवय होत जाते .बँक ब्यालंस नजरेच्या टप्प्यात येतो . ब्याचलर असे पर्यंत'' शेयरिंग रूमचा '' अनुभव मिळतो .
आता सुरु होते आई -बाबांना परदेश वारी घडविण्याची तयारी .
----------------------------------------------------------------------------------------
पासपोर्ट व व्हिसा काढणे ------- एक दिव्य---- !!!!
----------------------------------------------------------------
परदेश प्रवासास निघण्याची पहिली पायरी स्वतःचा --पास पोर्ट असणे . सध्या त्यासाठी भक्तांची मोठी रांग असते .
तसेच पोलीस व्हेरिफिकेशन वगैरे बाबींची पूर्तता होण्यास २--४ महिन्याचा कालावधी लागतो .पासपोर्ट आला म्हणजे परदेशी जाण्याचे बेत हवेत रंगवायला प्रारंभ होतो .पण दाल आटे का भाव काय असतो त्याची प्रचीती हळू हळू येऊ लागते .
अमेरिकेचा पासपोर्ट १० वर्ष कालावधीसाठी मिळतो .परंतु त्यास मोठ्या अडथल्यातून व प्रत्यक्ष इंटरव्यू साठी मुंबईस अमेरिकन वकिलातीत हजर रहावे लागते . त्या वेळी आपले फिंगर प्रिंट्स घेतात त्यावेळी हातास कोणती जखम व त्यावर मेंदीचा रंग असून चालत नाही .याची महिला वर्गाने विशेष दक्षता घ्यावी .अन्यथा पुनश्च जावे लागते .
परदेश प्रवासास निघण्या पूर्वी त्या त्या देशाच्या नियमानुसार ---- अधिकृत व्हिसा (Visitor Intended to Stay Abroad ) काढावा लागतो.
त्यासाठी प्रत्येकाला स्थावर जंगम मालमत्ता --बँक पुस्तके --इन्कम ट्याक्स रिटर्न इ माहितीची सर्व मूळ कागदपत्रे सादर करावी लागतात .
ज्याच्या कडे परदेशी राहणार त्याचा------ पत्ता- -बँक अकौंट --पासपोर्ट --व्हिसा--आमंत्रण केल्याचे पत्र इ.सर्व माहितीची मूळ कागद पत्रे लागतात.
फिंगर प्रिंट्सचे वेळी हातावर मेंदी असता कामा नये याची खबरदारी महिलांनी घ्यावी.
इंग्लंड U.K. चा व्हिसा --- ६ महिन्यांसाठीच मिळतो .इतर युरोप देशासाठी पुन्हा वेगळा शान्घैन व्हिसा लागतो.
अमेरीका व्हिसा साठी ---- पत्यक्ष मुलाखत द्यावी लागते . U.S. व्हिसा नशिबात असेल तर पहिल्या फटक्यात मिळतो .
अन्यथा कोणतेही कारण न देता नाकारला जाऊ शकतो. ६ महिने थांबावे लागते हा व्हिसा --सलग १० वर्षाचा मिळतो . ७ ते ८ हजार रु./-फी वाया जाते मनस्ताप होतो .त्यासाठी काळजी घ्यावी लागते.
या सर्व सोप संस्कारातून अर्थात अग्निदिव्यातून पार पडल्यावर आपण सुटकेचा निश्वास सोडतो आणि हवाहव्याश्या विमान प्रवासास पात्र ठरतो.
यासाठी आपली प्रकृती उत्तम असणे जरुरीचे असते त्यामुळे परदेश प्रवासाचा चांगला आनंद लुटता येतो .वेगवेगळ्या देशात गेल्यावर तेथील खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्याची तयारी करून ठेवावी म्हणजे निराशा होत नाही.
एखाद्या प्रवासी कंपनी बरोबरही परदेशी प्रवास करता येतो.पण त्यामध्ये थोडी घाई होते कारण थोड्या वेळात जास्त स्थळे ते दाखवितात .पण त्याची एक वेगळी मजा असते .विमानप्रवासाची पूर्व तयारी करून ३ महिने अगोदर विमान तिकीट काडल्यास बऱ्या पैकी स्वस्त मिळते.आयत्या वेळी तिकिटाच्या ८ -१० हजारापर्यंत फरक पडतो.तसेच दोन तीन एजंट कडे चोकशी केल्यासही फायदा होऊ शकतो .
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
अधांतरी
// विमान प्रवासाची पूर्व तयारी //
-------------------------------------------------------------------
ज्या विमान कंपनीचे तिकीट काढले असेल त्यांचे--- नियमानुसार आपण किती वजनाचे सामान घेऊ शकतो याचा अंदाज घ्यावा.
साधारण पणे २ मोठ्या ब्यागा ----(२३ किलो प्रत्येकी ) या ब्यागा विमानात स्वतंत्र विभागात असतात . व -----१ केबिन ब्याग ७ किलो आपल्या बरोबर असते --एवढे सामान घेता येते .
केबिन ब्यागेत ( विमानात आपल्या बरोबर असणारी ) द्रव पदार्थ -----कोस्म्यातीक्स --धारदार वस्तू अजिबात घेता येत नाही हे चांगलेच ध्यानात असू द्यावे .पासपोर्ट ---व्हिसा -- तिकिटाच्या झेरोक्स प्रत्येक ब्यागेत असू द्यावी .मूळ पासपोर्ट -तिकीट -जेथे जायचे तेथील पूर्ण पत्ता फोन सह एका स्वतंत्र छोट्या ह्यांडी पर्स मध्ये घ्यावे कारण ही माहिती जाता -येता स्वतंत्र पेपरवर लिहून द्यावी लागते .आपल्याला लागणारी औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिपशन सह असू द्या.
एवढी सर्व तयारी करून आपण अविस्मरणीय अश्या विमान प्रवासास निघतो .बरोबर एक वेळचे जेवण व एक दोन दिवस टिकणारे खाद्य पदार्थ घ्यावेत .विमातळावर सुमारे ३ तास अगोदर पोहोचावे अश्या बेताने पोहोचा.छान पैकी जेवण करावे फ्रेश होऊन तयार व्हावे .बरोबर आलेल्या स्नेहीजनांचा निरोप घेऊन------त्यांना पुन्हा भेटण्यासाठी थांबवून ,
आपले सामान त्र्वोलीवर घेऊन पासपोर्ट /तिकीट दाखवून आत प्रवेश करावा .आत गेल्यावर ज्या कंपनीच्या विमानाने जायचे त्या काऊनटर पाशी जावे .तेथे आपले पास-पोर्ट /तिकीट पाहून मोठ्या ब्यागाचे वजन करून त्या ताब्यात घेतल्या जातात .त्यावर नंबर टाकून आपला विमानात प्रवेश करण्यास लागणारा बोर्डिंग पास मिळतो .त्यावर ब्यागांचे नंबरचे स्टिकर्स असतात .आता विमानात घ्यावयाच्या प्रत्येक ब्यागेला--पर्स अथवा स्याक असेल त्याला विमान कंपनीचा ट्याग लावून घ्या म्हणजे ते अधिकृत पणे आपल्या बरोबर ठेवता येणारे सामान समजले जाते .
एवढ्या प्रक्रीये नंतर आपण पुन्हा एकदा सर्व ओ के ---- झाल्याचे सांगण्यास व आपणास सोडवायला आलेल्या नातेवैकांना भेटण्यास जावू शकतो .
कारण यानंतरची प्रक्रिया असते '' इमिग्रेशन '' अर्थात हा----- देश सोडल्याचा अधिकृत '' शिक्का '' पास पोर्ट वर बसण्याची. ह्या साठी आपल्या बद्दलच्या माहितीची एक स्लीप भरून द्यावी लागते .त्या मध्ये नाव -पत्ता --पासपोर्टची माहिती इ.गोष्टी भराव्या लागतात . व आपण सिक्युरिटी चेकिंग साठी पुढील दालनात येऊन त्यांच्या ----- पुनर्भेटी पर्यंत दृष्टी आड होतो .
येथ पर्यंतचा प्रवास प्रथमच विमान प्रवास करणाऱ्यांना उत्चुक्तेचा --संभ्रमाचा --वाटतो .
अश्या या ''अधांतरी '' प्रवासास आता अर्धविराम देऊया !!...............