( आध्यात्मिक दृष्टी कोनातून )
------------------------------
हा काय प्रश्न झाला . प्रत्येकजण स्वतःची ओळख मी ---माझे नाव--व्यवसाय --गाव ---कोणाचा मुलगा --काका-मामा-- अश्या प्रकारे देतो .पण हा माझा हात आहे . हा माझा----- पाय आहे . हे माझे शरीर आहे .-------हे म्हणणारा -----कोण ?
आपण मी पाय आहे -- ----- मी हात आहे असे कधीही --- म्हणत नाही .
तर तो माझा --- म्हणणारा असतो तो आपला -----आत्मा---आपली प्रत्येकाची चैतन्यशक्ती.एक जीवंतपणाची जाणीव करून देणारी अगम्य अशी शक्ती .आणि त्याचे स्थान असते दोन्ही डोळ्यांच्या ''भृकूटीच्या मध्ये .
लौकिक अर्थाने एकाच व्यक्तीची----- ओळख वरील प्रमाणे असणे सहाजिकच आहे .पण तो असतो नाते संबंध.अध्यामिक दृष्टी कोनातून
प्रत्येकाची एक संध ----- ओळख म्हणजे --एक--'' आत्मा ''.
आत्म्याचे आवरणअसते - ते ---आपले शरीर----- जे बनले आहे रस --रक्त --मांस --मेद--अस्थी --मज्जा --शुक्र या सप्त धातूंनी व पंच महाभूतांनी (पृथ्वी --आप --तेज-- वायू --आकाश ) त्यातील तेज असते ते '' ओजाचे ''.तसेच आत्मा -पवित्रता -ज्ञान -शांती -प्रेम -सुख -आनंद -शक्ती या सात गुणांनी युक्त असा असतो '.त्यामुळेच व्यक्ती प्रसन्नचित्त दिसते .
त्यामुळे शरीर व आत्मा हे प्रमुख दोन भाग झाले आपल्या----- '' मी '' चे .
त्यापैकी शरीर हे नाशवंत असते -----तर आत्मा हा अविनाशी असतो----- हे ही सर्वश्रुत आहेच .
शरीराची दैनंदिन स्वच्छता व निरोगी पणा आवश्यकच असते .हे आपल्या सर्वांना ठाऊकच आहे .
त्यासाठी दररोज आंघोळ व योग्य आहार विहार ओघाने आलाच.
जो आहार विहार करतो त्याचा परिणाम अर्थातच आपल्या शरीरावर व आत्म्या वरही होणार असतो .
पण सात्विक '' आत्म्यासाठी '' थोडे पथ्य पाणी असते त्याची दक्षता घेणे आवश्यक असते .
त्यासाठी मांसाहार -कांदा -लसून -उत्तेजक पेयपान व्यसन -रात्रीचे अती जाग्रण व कु -कर्म वर्ज्य असते .
पण 'आत्मा' नावाच्या चैतन्य शक्तीकडे मात्र आपले नकळत '' दुर्लक्ष्य '' होत असते .
त्यामुळेच आपले शरीर मात्र आजारी पडते --मलूल होते --निरुत्चाही होते--वेळ येताच नाशही पावते .
आपणास सुखी व निरोगी आयुष्य जगायचे असेल तर त्याची योग्य ती काळजी वेळीच घ्या
'' आत्मा ''-हा दोन्ही भृकुटी च्या मध्य भागी निवास करतो . अर्थात आपण कपाळावर अथवा स्त्रिया कुंकुमतिलक लावतात ती जागा.
आपण परमेश्वरास नमस्कार करताना कळत न कळत त्याचे स्मरणही त्या जागी स्पर्श करून करतच असतो.त्या स्थानाला अत्यंत महत्व आहे .
त्याचा आकार म्हणाल तर चक्क ''बिंदू '' स्वरूप .मूर्ती तर फारच लहान पण कीर्ती महानच---- !!!! आत्मा अमर आहे .त्याला मरण नाहीच.
( थोडक्यात आपल्या परिचयाच्या मोबाईल मध्ये -''-सीम कार्ड ''--चे जेवढे महत्व तेवढे .कारण मोबाईल कितीही मूल्यवान असला तरी त्यात सिमकार्ड नसेल तर त्याचा काहीच उपयोग होऊ शकत नाही .)
एखाद्याला संपवायची सुपारी घेतलेला क्रूर कर्माही या आत्म्याचे ठिकाणीच आपली बंदूक रोखतो .पण त्यामुळे संपते ते--- शरीर कारण आत्मा दिसत नसतोच. वैरही असते ते बाह्य दिसणाऱ्या शरीराशी.आत्मा मात्र आपले स्थान बदलून बेमालूम पणे दुसऱ्या आत्म्यात प्रवेश करतो.
हा आपला आत्मिक प्रवास अखंडपणे वर्षानु - वर्ष चालू आहे. आपले ''सृष्टीचक्र'' हे अविरत फिरत असते. निसर्गात उन्हाळा -पावसाळा -हिवाळा हे बारमाही ऋतुचक्र .मनुष्याचे बालपण -तारुण्य -म्हातारपण हे आयुष्याचे चक्र .
दिवसाचे पहाट--सकाळ -मध्यान्ह -रात्र हा दिनक्रम तर घड्याळात वेळेची-- रात्री १२ ते दुपारी १२ अशी -- २४ ताशी धावपळ .
आपल्या --सृष्टीचक्राचे प्रतिक आहे ते '' स्वस्तिक चिन्ह ''.
याचा कालावधी असतो ५००० वर्षाचा .त्याचे ४ भाग प्रत्येकी १२५० वर्ष कालावधीचे .
ते समोरून पाहिले असता घड्याळाचे चाली नुसार-त्याचे उजव्या बाजूचा वरील भाग म्हणजे --सतयुग त्या खालील --त्रेता युग
डावी कडील खालील --द्वापार व त्या वरील-- कलीयुग
कलियुग व सतयुग याचा संधी काल म्हणजे --संगम युग
आत्म्याचा प्रवास हा सृष्टी चक्रातून होताना त्यास ८४ वेळा जन्म- मरणाच्या फेऱ्यातून मार्गक्रमण करावे लागते.
* सतयुगात ---- o८ जन्म --- श्रीकृष्ण --लक्ष्मि नारायण या देवीदेवता रुपात ---लोकसंख्या --९ लाख --सूर्यवंशी
* त्रेतायुग ------ १२ जन्म ----श्रीराम -सीता यांचे देवी देवता रुपात -------- लोकसंख्या ---३३ करोड --- चंद्रवंशी
द्वापरयुग ------- २१ --जन्म --- येशू --इब्ब्राहीम- बुद्ध--नानक असे धर्म संस्थापक ---- लोकसंख्या ---कांही कोटी
* कलियुग -------- ४२ जन्म ---- आम जनता ------------------------------
संगम युग ------- 0१ जन्म
--------------
असे---- ८४ जन्म
--------------
यापैकी सत + त्रेता + संगम = २१ जन्म हे जन्म पुण्यवान आत्म्याचे प्रतिक - म्हणून २१ आकडा शुभ -दुर्वा -मोदकांसाठी.
३३ करोड देवीदेवता --त्रेता युगा अखेर -- त्याचे प्रतिक -म्हणून '' ३३ अनारश्यांचे '' वाण अधिक मासात जावयास देतात .
* आत्म्याचे ३ रूपे *
स्थूल रूप - ------लौकिक रूप -- मानवी शरीर
सूक्ष्म रूप ------अलौकिक रूप ---- आत्मा
तीन लोक पृथ्वी --- - सूक्ष्म वतन ------परम धाम
सर्व आत्म्यांचा पिता म्हणजे ----परमेश्वर --निवास स्थान परमधाम-- हे एकमेव असून जन्म मरणाच्या फेऱ्यात येत नाहीत.
आपण पृथ्वी तलावरील सर्व आत्मे वरील प्रमाणे ८४ वेळेच्या जन्म -मरण बंधनात अडकलेलो असतो .त्यातून सुटका नसते .हा सृष्टीचा नियम आहे .
जग ही एक रंगभूमी आहे .येथे आपणास परमात्म्याने आप आपला प्रवेश कण्यास पाठविले आहे .नाटकामध्ये जसे पात्र आपला स्टेज वरील सहभाग संपताच विंगेत एक्झिट घेतो त्याप्रमाणे आपला पृथ्वीवरील कार्य भाग संपताच 'मरण 'रुपी एक्झिट घ्यावी लागते.त्यावर आपले नियंत्रणनसते.त्यावर नियंत्रण फक्त 'परमात्म्याचे ' आपल्या पार अलौकिक पित्याचे असते .
सृष्टी चक्राचा --- सध्या कली युगाचा '' अती अखेरचा '' काल सुरु आहे .त्या वेळी परम पिता परमात्मा प्रत्यक्ष मानवी देहात अवतरतात .आपला परिचय देतात .आता आत्म्याचा पृथ्वी वरील कार्य भाग संपत आला आहे व सर्वाना आपल्या घरी जावयाचे आहे .तर मी तुम्हा सर्वाना नेण्यासाठी आलो आहे असे सांगतात .
ही झाली आत्म्याची अर्थात आपली स्वतःची स्वतःलाच ओळख .याचा आपल्या व्यक्तिश: आयुष्यात कसा उपयोग करून घ्यावयाचायासाठी --राजयोग मेडीटेशन च्या ज्ञानाची ---ओळख असणे जरूर आहे .
याची माहिती व प्रत्यक्ष्य '' राजयोग मेडीटेशन '' असा करावा हे आपल्या घराजवळील --
'' प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या''कोणत्याही केंद्रामध्ये मोफत मिळते .त्याचा अवश्य लाभ घ्यावा .
यांचे माहितीने जीवनाला एक नवी दिशा मिळते .जीवनातील विविध कटू प्रसंगांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते .
आपल्यावरच एखादा निराश होण्याचा प्रसंग का येतो ? त्यावर या ज्ञानाचा कसा उपयोग करून घ्यावयाचा याची सर्वांगीण जाणीव होते .
'' थोडक्यात ,आपला मोबाईल दिवसभर वापरल्या नंतर जसा ब्याट्री---- उतरल्याने काम देईनासा होतो .व त्यास पुन्हा चार्जिंगला लावावे लागते नंतर तो पुन्हा फ्रेश होतो .त्याच प्रमाणे आपला आत्मा '' ८४ जन्म -मरणाच्या'' फेऱ्यातून जातो .तसेच जीवन जगताना बाह्य परिणामांचा आपल्यावर कसा परिणाम होतो .त्यातून आध्यात्मिक ज्ञानाने त्यावर मात करून आपले जीवन- सुखी -प्रसन्न -दीर्घायू -तेजपुंज कसे करायचे याचा मार्ग सापडतो. याचा प्रत्यक्ष या -आध्यात्मिक ज्ञानाचा अनुभव घेण्यातच मजा आहे .
आम्ही तो घेत आहोत .तुम्हीही अनुभव घेऊन पहा ***************
No comments:
Post a Comment