१३ मे -- या वर्षीचा आमच्या लग्नाचा ३४ वा वाढ दिवस. .तर अमेरिकेत साजरा झालेला अपूर्व असा १ला वाढ दिवस.
खरेतर वाढदिवस हा --- लहान मुलांचा आनंदात बागडण्याचा दिवस .मित्रांसमवेत मजेत घालविण्याचा वा गोड धोड खाण्याचा दिवस. .
पण जेष्ठ नागरिक म्हणजे...... बालपणाची दुसरी आवृत्तीच नाही का ....? आणि पदेशात तर याचा चांगलाच अनुभव येतो .प्रत्येक गोष्टीसाठी आपणास आता थोर झालेल्या मुलांवर अवलंबून राहावे लागते . मिलिंद व उच्छाही सूनबाई सौ .प्राजक्ताने आमच्या लग्नाचा वाढ दिवसाचा घाट घातला. सकाळी आम्ही ल्याप ट्वापवर मुरलीमध्ये १३ शब्दाबद्दल ''१३ याने सब कूच तेरा ''असा समर्पण भाव असणारा असा शुभ अंक असे समजले. बाहेर ढगाळ हवामान त्यामुळे घरात बसूनच वेळ काढला.सायंकाळी पावभाजीचा झकास बेत ठरला त्याची पूर्व तयारी सुरु झाली त्या जोडीला प्राजक्ता-'' स्पेशल ''केक च्या तयारीला लागली.
औक्षण - वगैरे साग्रसंगीत , जोडीला आंबा बर्फी --फोटो शेषन आणि
श्री व सौ .भसाळे यांच्या पुण्याहून ------ ' आम्रमधुर '------ फोन वरील ई --- शुभेच्छा .
अश्या रीतीने एका..... अविस्मरणीय लग्नाच्या वाढदिवसाची सांगता झाली.आनंद द्विगुणीत झाला.
दो नैन मिले.....दो फुल खिले .....
दुनियामे बहार आयी.......इक रंग नया लायी /
दिल गाने लागा .......लहराने लागा .......
ली प्यारने अंगडाई....बजने लगी शहनाई //....................
हे आठवणीतील.सूर आळवीत नव्या उच्छाहाने पुढील वाढ दिवसाच्या आतुरतेत निद्राधीन झालो.
खरेतर वाढदिवस हा --- लहान मुलांचा आनंदात बागडण्याचा दिवस .मित्रांसमवेत मजेत घालविण्याचा वा गोड धोड खाण्याचा दिवस. .
अश्या रीतीने एका..... अविस्मरणीय लग्नाच्या वाढदिवसाची सांगता झाली.आनंद द्विगुणीत झाला.
No comments:
Post a Comment