मे महिन्याचा पहिला रविवार अमेरिकेत--- मदर्स डे म्हणून साजरा होतो .प्रसन्न सकाळी सौ .प्राजक्ता व मिलिंदने ग्रीटिंग कार्ड देऊन साजराही केला .त्यातील शब्द फारच बोलके होते .-----अ ----आ पासून ----अमेरिकन------ मॉम पर्यंतचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केल्या बद्दल ''हार्दिक शुभेछ्या ''....
मन सहजपणे गतकाळात डोकाऊ लागले .हाताची बोटे धरून --खाऊचा डबा व पाठीवर छोटेसे दप्तर घेऊन ११ नंबरच्या (पायी )तुरु तुरु पळणाऱ्या बसने वास्तविक------ '' नव्या जगाची ओळख '' सुरु झाली .
मराठीत आ = आत्मा व ई== ईश्वर यांच्या मिश्रणाने बनते ती ...'' आई ''
आईची आता --मम्मी झाली खरी ...पण ममता मात्र अजूनही तीच .
''देव जरी मज कधी भेटला ....
माग हवे ते माग म्हणाला .....
म्हणेन प्रभू रे ..........
माझे सारे जीवन देई मम ......बाळाला.. !!! ''
या' मानिनी ' चित्रपटातील ममतेने ओथंबलेल्या गीताप्रमाणे .
तीच नाजूक बोटे आज लीलया संगणकावर फिरत आहेत '' तीच '' भर भक्कम झालेली .....बोटे धरून आज आम्ही जगाचे अर्थात त्या टिंब रुपी देशाचे इंग्लंड --अमेरिकेचे महासागरा पलीकडले स्वप्नवत असे विशाल रूप प्रत्यक्ष पहात आहोत.
नाण्यालाही दोन बाजू असतातच ना..... !!
येथील विक एन्डच्या औटींगच्या वेळी वनभोजनाची पूर्व तयारी करून घेतलेले डबे --स्याक भरून घेतलेले सामान घेऊन ११ नंबरच्या बसने आताश्या दमणारी पावले ४ चाकी गाडीत कधी सुखावली ते कळलेच नाही .
आणि मागे दिसते ती नव्या पिढीची ''अनुष्काची '' ......इंग्लंड मधील नवी कोरी नव्या दमाची ११ नंबरची बस....... दुडू दुडू धावताना .
मराठीत आ = आत्मा व ई== ईश्वर यांच्या मिश्रणाने बनते ती ...'' आई ''
आईची आता --मम्मी झाली खरी ...पण ममता मात्र अजूनही तीच .
''देव जरी मज कधी भेटला ....
तीच नाजूक बोटे आज लीलया संगणकावर फिरत आहेत '' तीच '' भर भक्कम झालेली .....बोटे धरून आज आम्ही जगाचे अर्थात त्या टिंब रुपी देशाचे इंग्लंड --अमेरिकेचे महासागरा पलीकडले स्वप्नवत असे विशाल रूप प्रत्यक्ष पहात आहोत.
येथील विक एन्डच्या औटींगच्या वेळी वनभोजनाची पूर्व तयारी करून घेतलेले डबे --स्याक भरून घेतलेले सामान घेऊन ११ नंबरच्या बसने आताश्या दमणारी पावले ४ चाकी गाडीत कधी सुखावली ते कळलेच नाही .
आणि मागे दिसते ती नव्या पिढीची ''अनुष्काची '' ......इंग्लंड मधील नवी कोरी नव्या दमाची ११ नंबरची बस....... दुडू दुडू धावताना .
अर्थात पुनश्य ...श्री गणेशा ...सुरु करणारी
No comments:
Post a Comment