असावा सुंदर चोक्लेटचा बंगला --------
चंदेरी -सोनेरी चमचमता चांगला -----
असा बाल-- विश्वातील भला मोठा--'' बंगला ''आज प्रत्यक्षात अमेरिकेतील पेनसिल्वानिया राज्यातील -- हरशी येथील चॉकलेटच्या फ्याकटरीच्या रुपामध्ये बालचमुंच्या समवेत पहावयास मिळाला .आणि तो दिवस लहानपणच्या विश्वात हरवून गेला .
हंडन -व्हर्जिनिया --मेरील्यान्ड --नंतरच्या पेनसिल्वानिया राज्यातील ''हरशी ''येथे तीन तासाच्या कार प्रवासाने १२ चे सुमारास दाखल झालो .तेथील प्रवेशद्वारावरील आकर्षक फलकच आपल्याला आगामी चॉकलेटी सफरीची चुणूक दाखवितो.कार पार्किंगसाठी त्या भल्यामोठ्या पार्किंगलॉट मध्ये--- जागाशोधून कार पार्क करणे हे येथील कलाकौशल्याचे --आन्हिक--- उरकून घेतले .समोर दूरच्या टेकडीवरील हिरवळीतील ''WEL-COME TO HERSHY '' अशी पांढरी - अक्षरे दुरूनच दूरदेशींच्या ---- सगळ्या बाल राजकुमारांचे स्वागत करीत होती .
समोरच एक लाल पांढऱ्या रंगाची आकर्षक टर्याम आम्हास लवकर येण्यास खुणावत होती.असंख्य लहान थोर मुलांचे रंगीत कपडे व सर्व पालकांचे चेहऱ्यावरील उत्छुकता स्पष्ट दिसत होती .पोपटी रंगाचा रुबाबदार पोशाख केलेल्या चालकाच्या त्या ट्रोलीत बसून आतील फयाकटरीच्या मुख्य दालना जवळ ५ मिनिटाच्या प्रवासातच आलो . तेथील चॉकलेटी रंगाच्या भिंतीवर-- ''HERSHY'S -GREAT AMERICAN -CHOCOLATE -WORLD TOUR ''या पाटीकडे पाहताच क्यामेर्याची कवाडे उघडली.तेथे अजून एक वैशीष्ठ्य नजरेत भरले ते म्हणजे --बाहेरील-भागातील '' कव्हर्ड प्र्याम पार्किंग लॉट '' लहान मुलांच्या चार चाकी ..कार्स येथे ओळीमध्ये ...आज्ञाधारक लहान मुलां प्रमाणेच-- गुपचूप आपल्या बाल- मालकाच्या प्रतीक्षेत उभ्या होत्या .
सगळ्यांची पावले आता त्या-- अदभूत विश्वात रमण्यास वळाली.सुरवातीस चॉकलेट ज्या फळापासून बनते त्या अननसाप्रमणे असणाऱ्या कोको - फळाची झाडा पासून कशी तोड केली जाते याची माहिती टी .व्ही .वरील फिल्म मध्ये आपणास मिळत रहाते .या पिवळसर रंगाच्या फळातून फणस बी प्रमाणे दिसणाऱ्या बिया वेगळ्या करून त्या वाळवतात.हे बी-- कडवट चवीचे असते .त्याची वर्गवारी करून वाळलेल्या बिया कारखान्यातील बेल्टवर पसरून त्यांचा चोकलेटी प्रवास सुरु होतो.त्याची बारीक भुकटीत-पावडर बनते .त्यात शुद्ध दुध व साखर यांचे मिश्रणाने संपूर्ण यांत्रिक प्रक्रियेने विविध आकाराचे चॉकलेट्स बनलेले व त्याचे लहान मोठी आकर्षक प्याकिंग बाहेर येई पर्यंतचा सर्व प्रवासाचे दर्शन आपल्याला तेथील अंधाऱ्या--- गुहेमधील ट्रोलीच्या प्रवासाद्वारे पहावयास मिळते . या अदभूत दुनियेची सफर '' प्रत्येकास खमंग सुवास व ''चोकलेटचे दोन लहान मोदकांचा प्रसाद देऊन मोठ्या आनंदाचा ठेवा मिळून केंव्हा संपते हे कळतही नाही .विनामूल्य----- सफरीचे दार आता उघडते ते------'' विविध मूल्य'' असलेल्या---- चोकलेटच्या खऱ्या मॉलमध्ये .
येथे आपापल्या आवडी निवडीनुसार मनसोक्त चॉकलेटची खरेदी केल्याशिवाय बाहेर पडण्याचा मोह आवरता येत नाही . चॉकलेटच्या आकाराची खेळणी -टी शर्टस -की चेन्स -बॉल्स-याचीही हौसेने खरेदी होते . बाहेर येवून तेथील रंगीत फुले व हिरवळीच्या सहवासात आपणास पोट पूजा - करण्याची आठवण होते .आजू बाजूच्या नयनरम्य वातारणात फिरत असतानाच परतीच्या---- कडवट--- औषधाचीही आठवण होते.
'' अननस आहे जात फळाची खाण्या लागे फार मधुर --------
आगगाडीही जलद धावते निघतो तीच्या बंबी धूर --------''
या बाल गीताचीही आज प्रकर्षाने आठवण झाली . अननसा प्रमाणे दिसणाऱ्या --परंतु कडवट चवीच्या फळातील बियांपासून तयार होणाऱ्या व लहानथोरापर्यंत सर्वांच्याच पसंतीस उतरलेल्या मधुर अश्या '' चोकलेटी दुनियेच्या रम्यआठवणी ''- खिसा भर -भरून घेतच आम्ही तिचा निरोप घेतला तो------ चोक्लेटचा रसमधुर आस्वाद घेतच.
................................................
No comments:
Post a Comment