वर्जिनिया --मेरील्यांड --पेन्सिल्विनिया--ह्या तीन स्टेट पलीकडील न्यूयोर्क येथे पोहोचण्यास- आठ तास लागले .एव्हढा प्रदीर्घ प्रवास असूनही प्रशस्त रस्ते -सभोवतीची हिरवळ -दाट वृक्षराजी मुळे प्रवास नयन मनोहारी झाला. रेड कार्पेट- मोटेल (लोजिंग ) मध्ये येऊन फ्रेश झालो
लगेच तेथून --१० मैल दूर असलेल्या मुख्य आकर्षणाच्या ओढीकडे आपोआपच ओढले गेलो . न्युयोर्क मधील सायंकाळच्या रहदारीतून वाट काढीत आम्ही ''नायगरा धबधब्याच्या ''--NIAGARA -FALLS--NEWYORK STATE PARK '' परिसरात प्रवेश केला .डाव्या बाजूस संथ अश्या विस्तीर्ण पसरलेल्या नायगरा नदीचे पात्राचे दृश्य दिसू लागले .
कार पार्क--------- करून पायी त्या ऎस- पैस पसरलेल्या बागेतून कॅमेऱ्यासह .हिरवळीचा लांब रुंद पट्टाओलांडून नदीकाठाने फिरू लागलो .हळू हळू नदीच्या पाण्याच्या पात्राचा खळखळाट ऐकू येऊ लागला .जसजसे पुढे निघालो तसा नदीचा अवखळ पणा वाढू लागला .पात्रातील दगड धोंडे खाच खळगे ओलांडतही मंजुळ पणे आवाज करत वेगाने पुढे वहात होती .सफेद फेसाळ लेले पाण्याचे वाढत जाणारया फुगवट्यानी नदीचे पात्र अधिकच देखणे दिसू लागले अन--- कॅमेऱ्याचा किलकिलाट-- (क्लिक -क्लीकाट )केंव्हा सुरु झाला हे कळलेच नाही .
आजू बाजूस विविध देश वासीय आपापल्या पेहेरावात -प्रसन्न भाव मुद्रेत आपली छाप उमटवीत होते. रस्त्यावरून हिरव्यारंगाची जोड बस पर्यटकांना विस्तीर्ण बागेचे दर्शन घडवीत मजेत फिरविताना दिसत होती. नदीवरील पुलावरून जाणारे येणारे उत्साही जन सागर त्यावरून दिसणाऱ्या व वेगाने पुढे पळणाऱ्या पाण्याच्या शुभ्र धवल मोठ्या लाटा पाहत भान विसरून जाऊ लागला .पूल ओलांडून पलीकडे ''महाजनो गतः - सः पंथः // नुसार मार्ग क्रमण करू लागलो .वृक्ष वेलीतून वाट उताराचे दिशेने उतरत होती .काही पायऱ्या उतरून आम्ही एका विशाल टप्प्यावर आलो नी उजव्या बाजूस पहातो तो काय ----? नदीच्या सफेद - फेसाळ पाण्याचा लांब रुंद पडदा -- खोलवर दरीत झेपावणारा- घनगंभीर आवाजातील प्रपात !!!!!.अहाहा... !!! वाउ-- हे शब्दही अपुरे पडतील असे ते नेत्र सुखद--दृश्य. नायगऱ्याचे प्रथम दर्शनातच ------' ती पाहता मधुर-बाला कलिजा-खलास झाला '' अशी अवस्था न होईल तरच नवल .ते दृश्य पाहण्याचे आपणही साक्षीदार आहोत याची प्रत्यक्ष्य छबी उमटविण्याचा सर्वांची अहमहमिका सुरु होतीच .अंधार पडू लागला .दिवे चमकू लागले .नदीतील पाणी खोलवर दरीत आतापर्यंतच्या धावपळीने दमछाक झाल्याने----- संथ गतीने जाताना दिसत होते .
समोर नदी पलीकडे ''कॅनडा'' देशाची राजधानी '' टोरांटो शहरातील देखणी उंच अशी रीव्हाल्विंग हॉटेल --कॅसिनो आदी इमारतीचा देखावा तिकडे येण्यास खुणावत असतो. क्षण भरातच समोरून दिव्यांचे फोकस पाण्याच्या प्रपातावर पडून लाल -गुलाबी- हिरवे रंगांचे पट्टे वाहताना दिसू लागले. या धबधब्यातून पडणाऱ्या पाण्याचा प्रचंड अश्या पाण्याच्या पांढऱ्या शुभ्र तुषारांवर पडणारे प्रकाशझोत इंद्रधनुष्याची मजा आणतात .
तसेच या नदीच्या दरीतून दोन्ही तीरांना जोडणाऱ्या महाकाय लोखंडी कमानीवर ''RAINBOW BRIDGE''हा पूल दिमाखात उभारून येथील निष्णात तंत्रज्ञाची कला कुशलता नजरेत भरते.त्या वरून पायी व कार द्वारे हाकेच्या अंतरावरील कॅनडा-अमेरिका वाहतूक निर्धोकपणे वहात असल्याचे दिसून येते .त्यासाठी आवश्यक असते ती फक्त अधिकृत पारपत्राची आणि व्हिसा .................... ..............
No comments:
Post a Comment