मनुष्य हा एक सदा अतृप्त प्राणी असतो .हे येथील इतर ५ आकर्षानावरून दिसून येते .आतापर्यंत नेत्रसुख दिलेल्या '' नायगऱ्याच्या '' अधिकाधिक जवळ जाण्यासाठी ती असलेली ती ५ आकर्षणे या विस्तीर्ण परिसरात आहेत .
१ ) MAID OF THE MIST ---एका मोठ्या मनोऱ्या वरून धबधब्याचे तीन भाग दिसतात .१ AMERICAN FALLS----- BRIDAL VEIL FALLS--HORSESHOE FALLS
येथील '' ओब्झर्व्हेषण '' टोवर मधील लिफ्टने खोलवर दरीतून नायगरा नदीकाठी क्षणात उतरायचे. तेथील दुमजली बोट आपणास नदी पात्रात खोलवर पडणार्या पाण्याचे प्रपाताचे जवळून फेरफटका मारून आणते .त्यासाठी रेनकोट घालावे लागतात .पण बोट जेंव्हा त्या जवळ येते तेंव्हा पाण्याच्या प्रचंड तुषारांच्या धूसरपणाचा फायदा घेत ते पाणी आपणास नख शिखांत भिजवून मोकळे होते .ही अनोखी रंग पंचमीची मजा सर्व पर्यटक आनंदात फोटो घेत लुटतात .
२ ) CAVE OF THE WINDS --- यासाठी डोंगर पोखरून सोय केलेल्या लिफ्ट मधून नायगरा नदी तळाशी येतो .तेथून लाकडी जिन्याने HURRICANE DECK WAR वरून पडणाऱ्या पाण्याचे तुषारांच्या थंडगार लोंढ्याने सचैल आंघोळ करण्याचा मनमुराद आनंद घेता येतो . 3 ) NIAGARA GORGE DISCOVERY CENTER---- छोट्या थियेटर मध्ये चित्रपटाद्वारे या नायगर्या नदीचा इतिहास उलगडला जातो .
४) AQUARIUM OF NIAGARA --- विविध माशांचे प्रदर्शन येथे पहावयास मिळते .
५ )NIAGRA FALLS SCENIC TROLLEY -----अर्ध्या तासाच्या या जोड बसमधून आपल्याला या पार्कचा अखंड प्रवास घडतो .वरील सर्व ठिकाणे पाहून झाल्यावर यामधून पुढे- पुढे प्रवास करत आरामात टाईम पास होतो .
हौशी पर्यटकांसाठी --Rainbow Air --HELICOPTER TOUR--above and around the falls to enjoy the majestic power and beauty of the falls from air is available.
अश्या अत्याधुनिक यांत्रिक सुख सोयींनी----- ''नायगऱ्याने पुढे केलेल्या दोन हातांच्या (Horse-shoe falls) प्रचंड मिठीत सामावण्याचा एक प्रयत्न अमेरिकन कुशल तंत्रज्ञांनी केलेला दिसून येतो आणि आपणही त्याची मजा लुटतो .
हे सर्व पहात असताना पायपीटही भरपूर होते .उदर भरणासाठी आम्ही ''कोहिनूर ''या पंजाबी हॉटेलच्या बुफे जेवणाचा आस्वाद घेतला .तेथे चक्क -कढी- भाजी --पालक पनीर --बुंदी रायता बटाटा-कोबिमिक्स भाजी चपाती आणि भरपूर पाणी सुद्धा असा भरपेट इंडिअन मेनू होता .
येथील '' ओब्झर्व्हेषण '' टोवर मधील लिफ्टने खोलवर दरीतून नायगरा नदीकाठी क्षणात उतरायचे. तेथील दुमजली बोट आपणास नदी पात्रात खोलवर पडणार्या पाण्याचे प्रपाताचे जवळून फेरफटका मारून आणते .त्यासाठी रेनकोट घालावे लागतात .पण बोट जेंव्हा त्या जवळ येते तेंव्हा पाण्याच्या प्रचंड तुषारांच्या धूसरपणाचा फायदा घेत ते पाणी आपणास नख शिखांत भिजवून मोकळे होते .ही अनोखी रंग पंचमीची मजा सर्व पर्यटक आनंदात फोटो घेत लुटतात .
२ ) CAVE OF THE WINDS --- यासाठी डोंगर पोखरून सोय केलेल्या लिफ्ट मधून नायगरा नदी तळाशी येतो .तेथून लाकडी जिन्याने HURRICANE DECK WAR वरून पडणाऱ्या पाण्याचे तुषारांच्या थंडगार लोंढ्याने सचैल आंघोळ करण्याचा मनमुराद आनंद घेता येतो .
४) AQUARIUM OF NIAGARA --- विविध माशांचे प्रदर्शन येथे पहावयास मिळते .
५ )NIAGRA FALLS SCENIC TROLLEY -----अर्ध्या तासाच्या या जोड बसमधून आपल्याला या पार्कचा अखंड प्रवास घडतो .वरील सर्व ठिकाणे पाहून झाल्यावर यामधून पुढे- पुढे प्रवास करत आरामात टाईम पास होतो .
हौशी पर्यटकांसाठी --Rainbow Air --HELICOPTER TOUR--above and around the falls to enjoy the majestic power and beauty of the falls from air is available.
अश्या अत्याधुनिक यांत्रिक सुख सोयींनी----- ''नायगऱ्याने पुढे केलेल्या दोन हातांच्या (Horse-shoe falls) प्रचंड मिठीत सामावण्याचा एक प्रयत्न अमेरिकन कुशल तंत्रज्ञांनी केलेला दिसून येतो आणि आपणही त्याची मजा लुटतो .
हे सर्व पहात असताना पायपीटही भरपूर होते .उदर भरणासाठी आम्ही ''कोहिनूर ''या पंजाबी हॉटेलच्या बुफे जेवणाचा आस्वाद घेतला .तेथे चक्क -कढी- भाजी --पालक पनीर --बुंदी रायता बटाटा-कोबिमिक्स भाजी चपाती आणि भरपूर पाणी सुद्धा असा भरपेट इंडिअन मेनू होता .
न्यू योर्क मधील'' तोनावंदा '' शहराच्या कोन्दणातील ''नायगरा ''ह्या पांढरा शुभ्र हिऱ्याची नेत्रदीपक चमक डोळ्यात साठवून त्याचे पाण्याने '' चिंब भिजूनच '' आमची दोन दिवसांची लॉंग विक एंड टूर ची सांगता झाली .आमच्या '' पर्यटन खात्यात '' पंच ज्ञानेन्द्रीयाना तृप्त करणारी जगप्रसिद्ध निसर्ग किमयेची NIAGARA - FALLS ची नोन्द झाली ती कायमची.
No comments:
Post a Comment