''-Smithsoniyan- National Museum of Amarican History ''
जुने ते सोने----- याचा खरा अर्थ येथील म्युझियम पाहून चांगलाच लक्षात येतो .
जेम्स स्मिथसोनियन नावाच्या '' ब्रिटीश शास्त्रज्ञाने ''आपली सर्व संपती स्मिथसोनियन संस्था - अमेरिकेतील वाशिंग्टन -येथे ''स्मिथसोनियन संस्था ''स्थापण्यास अमेरिकेस अर्पण केली . तीही या देशात न येता त्यांच्या स्तुत्य कामावर विश्वास ठेऊन . त्याचा मुख्य उद्देश होता --- ''ज्ञानाची वाढ व प्रसार ''. त्याचा आज मोठा वट वृक्ष झालेला आपणास आज पहावयास मिळतो आहे ते ----जगातील एक अव्वल दर्जा असलेली व शास्त्रीय संशोधनास प्रोत्चाहन देणारी मोठ्या संस्थेच्या रूपाने .
इतिहास -भूगोल--- हे तसे शालेय जीवनात दुर्लक्षित विषय ,पण याच विषयातील संदर्भातील माहिती पुढील पिढीसाठी जतन करून आकर्षक पद्धतीने मांडण्याचा एक- स्तुत्य उपक्रम-म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले तरच याची महानता लक्ष्यात येते .आणि त्यास दिलेली..... शास्त्र विषयाची जोड म्हणजे सोनेपे सुहागा दुसरे काय ?
अमेरिकेचा अथ पासूनचा इतिहास त्यांनी केलेली प्रगती त्यात सहभागी असलेले थोर असे ....वाशिंग्टन--अब्राहम लिंकन --जॉन केनेडी --रेगन ---निक्सन ---- जॉर्ज बुश ते थेट बराक ओबामा यांचा सहभाग .तसेच थोर शास्त्रज्ञ थोमास अल्वा एडिसन एक ना दोन .चंद्र्यानाचा उपक्रम अश्या सर्वांगीण विषयाला गवसणी घालणारे म्युझियम पाहताना दमछाक झाली नाही-- तरच नवल .अनेक शाळेतील विद्यार्थ्यांना असंख्य पुस्तके वाचूनही कमीच पडणारी
ही जादुई दुनिया येथे पहावयास मिळते ,विचारांना नवी दिशा मिळते .
शेवटी शेवटी तर पेंगुळलेली अनेक मुले तेथेच प्रशस्त दालनात फतकल मारून गप्पात दंग असल्याची दिसतात .
अश्या या अनोख्या विश्वाची सफर करण्यास रोज हजारो पर्यटक या वास्तूस भेट देतात व 'मुक्तपणे ' आणि मुफ्तमध्ये येथील .. .....ज्ञान सागरात दिवसभर अक्षरश: डुंबून जातात.हे म्युझियम पाहण्यास एक पूर्ण दिवसही अपुराच पडतो .
या --- सफरीस येताना ----भोजन -- भाऊची उत्तम व्यवस्था करूनच यावे लागते .समोर प्रशस्त हिरवळीचा गालीचा सदैव तयारच आहेच वन भोजनाचा आनंद घेण्यास .तर चला तयारीला लागा .
No comments:
Post a Comment